बराच वेळ बसूनही पोट साफ होत नाही? लगेच करा हे 3 उपाय, दूर होईल समस्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 10:24 AM2023-09-11T10:24:56+5:302023-09-11T10:25:41+5:30
जर सकाळी पोट साफ झालं नाही तर दिवसही बेकार जातो. जर रोजच असं होत असेल तर समस्या आणखी वाढते.
How to Clean Stomach : सकाळी पोट साफ न होणं ही एक कॉमन समस्या आहे. बऱ्याच लोकांना ही समस्या असते. जर सकाळी पोट साफ झालं नाही तर दिवसही बेकार जातो. जर रोजच असं होत असेल तर समस्या आणखी वाढते. सकाळी पोट साफ न होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. यात शरीरात पाणी कमी असणं, जेवणाची चुकीची वेळ, झोप पूर्ण न होणं आणि चुकीचं खाणं-पिणं यांचा समावेश आहे. यामुळे दिवसभर गॅस, अॅसि़डिटी, पोटदुखी आणि छातीत जळजळ अशा समस्या होत राहतात. आज आम्ही तुम्हाला सकाळी पोट साफ होण्यासाठी 3 घरगुती उपाय सांगणार आहोत.
दही
दह्याच्या सेवन करणं पोटासाठी रामबाण उपाय मानलं जातं. एका रिसर्चनुसार, दह्यात असणाऱ्या लॅक्टिक अॅसिडमुळे पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत मिळते. तसेच दह्यात असणाऱ्या बॅक्टेरियानेही पोटाची समस्या दूर होते. रोज दह्याचं सेवन केलं तर डायरिया आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
सफरचंद
पोट साफ करण्यासाठी रोज एक सफरचंद खायला हवं. सफरचंदात पेक्टिन, पॉलीफेनॉल आणि फायबरसारखे तत्व भरपूर असतात. जे पोट साफ करण्यास मदत करतात. यामुळे पोटात असलेलं मायक्रोबायोटा व्यवस्थित काम करतं. याने पोट साफ होण्यास मदत मिळते.
कोमट पाणी आणि लिंबू
रोज सकाळी पोट साफ करण्यासाठी लिंबूपाणी पिणंही फायदेशीर ठरतं. रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात लिंबाचा रस टाका. हे पाणी प्यायल्याने आतड्यांमध्ये चिकटलेलं अन्न बाहेर निघतं.