तुम्ही उभ्याने पाणी पिता का? असं करणं पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 10:58 AM2018-05-18T10:58:43+5:302018-05-18T10:58:43+5:30

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेक तास घराबाहेर असतो. त्यामुळे पाणी उभ्याने प्यायचीच सवय लागते. पण ती शरीरासाठी घातक असते. 

Health Tips : 6 reasons you should never drink water while standing | तुम्ही उभ्याने पाणी पिता का? असं करणं पडू शकतं महागात

तुम्ही उभ्याने पाणी पिता का? असं करणं पडू शकतं महागात

Next

(Image Credit: direktno.hr)

घरात कधीना कधी तुम्ही 'पाणी उभं राहून पिऊ नका'....असं घरातील मोठ्यांकडून ऐकलं असेल. ते असं का बोलत असतील याचा आपण विचार करत नाही. त्यांचं असं बोलण्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. ते कारण तुमच्या आरोग्याशी संबंधीत आहे. उभं राहून पाणी पिणे आरोग्यासाठी कायम धोकादायक असतं. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेक तास घराबाहेर असतो. त्यामुळे पाणी उभ्याने प्यायचीच सवय लागते. पण ती शरीरासाठी घातक असते. 

उभं राहून पाणी प्यायलावर काय होतं?

1) किडनीचे आजार

उभे राहून पाणी प्यायल्यास ते पाणी शरीरातून थेट वाहून जाते आणि त्याचा शरीराला विशेष फायदा होत नाही. पाणी वेगाने वाहून किडनी आणि मूत्राशयातील घाण तशीच राहते. त्यामुळे मूत्रमार्ग किंवा किडनीत संसर्ग होऊ शकतो. आणि हा संसर्गामुळे किडनीला कायमस्वरूपी इजा करू शकते. 

2) पचनप्रक्रियेत समस्या

उभ्याने पाणी प्यायल्यावर ते थेट पाणी अन्ननलिकेद्वारे पोटात जाते. उभ्याने पाणी प्यायल्यास पाणी थेट अन्ननलिकेच्या स्थायूंवर दाब टाकते. त्यामुळे उभं राहून पाणी प्यायल्यास पचनप्रक्रियेत समस्या निर्माण होऊन पचनाचे विविध विकार जडू शकतात.

3) तहान भागत नाही

उभं राहून पाणी प्यायल्यावर तहान कधीच भागत नाही. उभं राहून पाणी प्यायल्यास तुम्हाला सतत थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावेसे वाटते. त्यामुळेच निवांत एक जागी बसून पाणी प्यायल्यास तहान पूर्णपणे भागते. आणि पाण्याचा चांगला आस्वाद घेता येतो. 

4) सांधेदुखी

उभ्याने आणि घाईघाईने पाणी प्यायल्यामुळे सर्वात जास्त परिणाम हा सांध्यावर होत असते. यामुळे आर्थरायटिसचा त्रास होऊ शकतो. शरीराच्या सांध्यांतील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते. त्यामुळे अचानक क्रॅम्प येणे किंवा सांधे दुखणे यासारख्या लक्षणांपासून या आजाराची सुरुवात होते.

5) शरीरातील आम्ल पदार्थांचे प्रमाण कमी होत नाही

पाणी शांतपणे बसून प्यायल्यास शरीरामधील आम्लाच्या प्रमाणात समतोल राखला जातो. उभ्याने पाणी प्यायल्यास शरीरातील इतर द्रव्यांबरोबर ते मिसळत नाही. या उलट बसून पाणी प्यायल्यास ते योग्य प्रमाणत शरीरातील आम्ल पदार्थांबरोबर मिसळून त्या पदार्थांचे शरीरातील समतोल राखण्यास मदत करते.

6) जळजळ होणे

उभ्याने पाणी प्यायल्यास ते अन्ननलिकेच्या खालील भागावर जोरदार आघात होतो. त्यामुळे पोट आणि अन्ननलिकेला जोडणाऱ्या स्नायूंवर दाब पडतो आणि त्याला इजा पोहचण्याचा धोका असतो. त्यामुळे पोटात जळजळ होण्याचा त्रास होतो.

Web Title: Health Tips : 6 reasons you should never drink water while standing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.