कोरोनानंतर आजार लपवण्याचा वाढला ट्रेंड; १०० कोटी लोकांना 'या' गोष्टीची भीती, रिसर्चमध्ये खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 12:00 PM2024-07-26T12:00:15+5:302024-07-26T12:01:55+5:30

लोक त्यांच्या आजाराबद्दल लपवतात आणि त्याबद्दल बोलायला त्यांना आवडत नाही. जेव्हा लक्षणं अधिक तीव्र असतात किंवा संसर्ग होतो तेव्हाही लोक त्यांची लक्षणं लपवण्याचा प्रयत्न करतात.

health tips after covid people hide their diseases know this shocking reason behind it | कोरोनानंतर आजार लपवण्याचा वाढला ट्रेंड; १०० कोटी लोकांना 'या' गोष्टीची भीती, रिसर्चमध्ये खुलासा

कोरोनानंतर आजार लपवण्याचा वाढला ट्रेंड; १०० कोटी लोकांना 'या' गोष्टीची भीती, रिसर्चमध्ये खुलासा

आजारपण हे वेदना आणि त्रासांचं कारण आहे. आपल्या आजाराबद्दल बोलणं अनेकांना आवडत नाही. अर्थातच लक्षणं दिसून येतात, पण जेव्हा तुम्हाला कोणी कसे आहात असं विचारतं तेव्हा तुम्ही ठीक आहे असंच उत्तर देता. काही लोक डिप्रेशनने त्रस्त आहेत तर काही कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी लढा देत आहेत. काहींना एपिलेप्सी आहे तर काहींना एड्सचा सामना करावा लागत आहे. इतकेच नाही तर घसा दुखत असेल किंवा सर्दी झाली असेल तरी लोक ऑफिसमध्ये जातात आणि आजारी असतानाही निरोगी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतात.

नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमध्ये जे समोर आलं आहे ते आश्चर्यकारक आहे. सायकोलॉजिकल सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की हे वागणं अगदी सामान्य आहे. खरं तर लोक त्यांच्या आजाराबद्दल लपवतात आणि त्याबद्दल बोलायला त्यांना आवडत नाही. जेव्हा लक्षणं अधिक तीव्र असतात किंवा संसर्ग होतो तेव्हाही लोक त्यांची लक्षणं लपवण्याचा प्रयत्न करतात. लोक फक्त सर्दीच नाही तर फ्लू सारख्या गंभीर समस्यांबाबत इतरांसोबत बोलू इच्छित नाहीत.

 १०० कोटी लोक लपवत आहेत आपला आजार 

रिसचर्सने सामाजिक वागणुकीमागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली की यामागे कोणतेही एक कारण नाही. किंबहुना, इतरांकडून आपल्याला जज केलं जाईल याची लोकांना खूप भीती वाटते आणि नकारात्मक विचारामुळे ते आपला आजार लपवण्याचा प्रयत्न करतात. 

आपल्या समस्या सर्वांना सांगितल्या तर काम करण्याची संधी मिळणार नाही, असे लोकांना वाटते. लोकांपासून दूर राहावं लागेल आणि ऑफिसमध्ये भेदभाव होऊ शकतो, अशी विचारसरणी लोकांच्या मनात रुजली आहे. तसेच आजारी व्यक्तीला समाजात कमकुवत समजलं जातं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार जगभरात सुमारे १०० कोटी लोक आहेत जे आपला आजार लपवून जगत आहेत.

कोविड नंतर आजार लपवण्याचा ट्रेंड

सामाजिक स्वभाव देखील माणसांना आजार लपविण्यास प्रवृत्त करतो. कोणताही संसर्गजन्य रोग आढळल्यास, त्याला रोखण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे स्वतःला लोकांपासून वेगळं करा. कोविडच्या दिवसांमध्ये लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. जेव्हा जेव्हा असा आजार होतो तेव्हा लोकांना कोविडचे ते दिवस आठवतात. आर्थिक प्रेशर आणि कामाची बांधिलकी देखील लोकांना त्यांचे आजार लपवण्यास प्रवृत्त करते, म्हणूनच कोरोना महामारीनंतर आजार लपवण्याचा ट्रेंड वाढला आहे.

आजाराबद्दल बोलणं अत्यंत गरजेचं 

जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा तुमच्या समस्या आणि लक्षणं सांगून तुम्ही केवळ स्वतःला निरोगी ठेवू शकत नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या आरोग्याची देखील काळजी घेऊ शकता. विशेषत: हृदयासंबंधित आजार असलेले लोक किंवा वृद्ध लोक यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांना संसर्ग होण्यापासून आपण वाचवू शकतो. 

Web Title: health tips after covid people hide their diseases know this shocking reason behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.