उन्हाळ्यात खजूर खाण्याचे आरोग्याला होतात अनेक फायदे, वाचाल तर अवाक् व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 03:31 PM2023-03-31T15:31:56+5:302023-03-31T15:44:32+5:30

Khajur Health Benefits : खजुराचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कारण खजुरामध्ये आयर्न, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, मॅगझीन, तांबे इत्यादी पोषक तत्वे असतात. 

Health Tips : Amazing benefits of eating khajur in summer | उन्हाळ्यात खजूर खाण्याचे आरोग्याला होतात अनेक फायदे, वाचाल तर अवाक् व्हाल

उन्हाळ्यात खजूर खाण्याचे आरोग्याला होतात अनेक फायदे, वाचाल तर अवाक् व्हाल

googlenewsNext

Khajur Health Benefits : खजूर म्हणजेच खारीक खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. पण त्याचे नेमके काय फायदे होतात हे अनेकांना माहीत नसतं. खजुरामध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर मिळतं. ज्याने तुमची पचनक्रिया चांगली राहते. त्यासोबतच याचे अनेक फायदेही आहेत. खजुरामध्ये आयर्न, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, मॅगझीन, तांबे इत्यादी पोषक तत्वे असतात. 

1) हृदय चांगलं राहतं

100 ग्रॅम खजुरात अधिक प्रमाणात पोटॅशिअम असतं. डब्ल्यूएचओच्या गाईडलाईननुसार, शरीराला पोटॅशिअम कमी मिळाल्याने ब्लड प्रेशर, हृदय विकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधीत आणखीही समस्या वाढण्याची शक्यता अधिक असते. 

2) हाडांना मिळते मजबूती

खजूर खाल्ल्याने कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन बी6 असतात. कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम दोन्हीमुळे हाडे मजबूज होतात.

3) अशक्तपणा होतो दूर

शरीरात आयर्न कमी झाल्यास अशक्तपणा येऊ शकतो. खजुरामध्ये आयर्न मोठ्या प्रणामात आढळतं. त्यामुळे तुम्हाला अशक्तपणाचा त्रास होणार नाही. 

4) शूगर लेव्हलवर नियंत्रण

जर काही गोड खाण्याचं मन झालं तर कॅंडी खाण्याऐवजी दोन खजूर खावे. गोड खाण्याची तलब भागवण्यासाठी खजूर खाणे सर्वात हेल्दी पद्धत आहे. पण यात कॅलरीजही अधिक प्रमाणात असल्याने जास्त खाणे नुकसानकारक ठरु शकतं. 

5) पचनक्रिया चांगली राहते

खजुरात फायबरचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे खजूर खाल्ल्याने पचनक्रिया नियंत्रणात राहते. यामुळे हृदयाचे आजारही होण्याची शक्यता कमी असते. 

6) त्वचा चमकते

खजूर त्वचेसाठी खूप चांगले आहे. खजूर खाण्यामुळे चेहऱ्याला तेजी येते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचा अधिक उजळ होण्यास मदत होते.

7) स्पर्म काउंट वाढतो

खजूर खाल्ल्याने पुरूषांमध्ये  स्पर्म काउंट आणि स्पर्म क्वालिटी वाढण्यास मदत मिळते. यात एस्ट्राडियोल आणि फ्लेवोनोइड सारखे पोषक तत्व असतात. जे स्पर्म काउंट वाढवण्यास मदत करतात.

Web Title: Health Tips : Amazing benefits of eating khajur in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.