तुम्हाला साडे तीन बोटांचा आजार तर नाही ना?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 04:19 PM2018-05-03T16:19:49+5:302018-05-03T16:19:49+5:30
लोक आता लिहिण्यापेक्षा टाईप जास्त करायला लागले आहेत. नोकरदार लोक रोज 8 ते 9 तास किबोर्डवर बोटे फिरवू लागले आहेत.
(Image Credit: AudioJungle)
मुंबई : कागद आणि पेनाची जागा आता कम्प्युटरने घेतली आहे. लोक आता लिहिण्यापेक्षा टाईप जास्त करायला लागले आहेत. नोकरदार लोक रोज 8 ते 9 तास किबोर्डवर बोटे फिरवू लागले आहेत. पण काय तुम्हाला माहित आहे की, सततच्या टायपिंगमुळे तुम्हाला साडे तीन बोटांचा आजार होऊ शकतो.
कसा होतो हा आजार?
सोसायटी फॉर अल्जायमर अॅन्ड एजिंग रिसर्चचे जनरल सेक्रेटरी डॉ. विकास धिकव यांनी नवभारत टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, टायपिंग काही काळानंतर तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते. जर एखादी व्यक्ती 5 वर्षांपर्यंत रोज 5 ते 6 तास टायपिंग करत असेल त्याच्या मनगटाला, अंगठ्याला, अंगठ्याच्या बाजूच्या बोटाला आणि तिसऱ्या बोटाला त्रास होऊ लागतो. त्यामुळेच या दुखण्याला साडे तीन बोटांचा आजार म्हटलं जातं. मनगटात एक मीडियन नस असते, जी दबल्याने ही समस्या निर्माण होते. साधारण भाषेत याला साडे तीन बोटांचा आजार आणि सायन्सच्या भाषेत कार्पल टनल सिंड्रोम असे म्हटले जाते.
या त्रासाने तरुण जास्त ग्रस्त
हा त्रास तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. कारण ते दिवसभर लॅपटॉपवर काम करतात आणि सोशल मीडियाचा वापर करतात. यावर डॉक्टरांनी सांगितले की, 18 ते 55 वर्षांच्या लोकांमध्ये हा त्रास मोठ्या प्रमाणात आढळतो.
आजाराचे लक्षण
- हात दुखणे
- हात सून्न होणे
- हातात कमजोरी येणे
- पेन किंना पेन्सील पकडण्यास त्रास
काय कराल उपाय?
- एक तास टायपिंग केल्यानंतर 5 मिनिटांता ब्रेक घ्या
- रिस्ट बॅन्ड वापरु शकता
- हातांचा व्यायाम करा