Health Tips : 'या' दोन पदार्थांमुळे कमी होत आहे तुमचं आयुष्य, वाचा जास्त जगायचं असेल तर काय खावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 05:06 PM2022-02-10T17:06:25+5:302022-02-10T17:09:46+5:30

Food for long life : जर कुणी हेल्दी डाएट घेत असेल तर ते निरोगी आणि फिट राहतात. तर अनहेल्दी फूड खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो आणि शरीर अनेक आजारांचं घर बनतं. आजार झाल्यावर लोकांचं जीवन हळूहळू कमी होऊ लागतं.

Health Tips : Avoid red and processed meat for live longer and eat a diet rich in legumes lentils and nuts | Health Tips : 'या' दोन पदार्थांमुळे कमी होत आहे तुमचं आयुष्य, वाचा जास्त जगायचं असेल तर काय खावे?

Health Tips : 'या' दोन पदार्थांमुळे कमी होत आहे तुमचं आयुष्य, वाचा जास्त जगायचं असेल तर काय खावे?

Next

Food for long life : निरोगी आणि फिट राहण्यासाठी लोक नको नको ते करतात. सकाळी उठून कोमट पाणी पिण्यापासून ते रात्री जेवणानंतर फिरायला जाण्यापर्यंत अशी काम लोक करतात. पण एक्सपर्ट सांगतात की, निरोगी आणि फिट राहण्यासाठी सर्वात फायदेशीर ठरते तुमची डाएट. जर कुणी हेल्दी डाएट घेत असेल तर ते निरोगी आणि फिट राहतात. तर अनहेल्दी फूड खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो आणि शरीर अनेक आजारांचं घर बनतं. आजार झाल्यावर लोकांचं जीवन हळूहळू कमी होऊ लागतं.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, जे लोक आपल्या डाएटमध्ये रेड मीट आणि प्रोसेस्ड मीटऐवजी डाळ, हिरव्या भाज्या आणि नट्सचा समावेश करतात ते लोक १३ वर्ष अधिक जास्त जगतात. असंही सांगण्यात आलं आहे की,  जर वयोवृद्ध लोकांनीही आपल्या डाएटमध्ये या फूड्सचा समावेश केला तर तेही ३ ते ८ वर्ष अधिक जिवंत राहू शकतात.

काय सांगतो रिसर्च?

PLOS मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, डाएटमध्ये रेट आणि प्रोसेस्ड मीटच्या तुलनेत जास्त कडधान्य, भाज्या आणि नट्स यांचा समावेश केल्याने आयुष्य वाढण्यास मदत मिळते. नॉर्वेमध्ये झालेल्या रिसर्चनुसार, परदेशात राहणारे लोक डाएटमध्ये ड्रायफ्रूट्स, फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करत नाहीत. वेस्टर्न कल्चरमध्ये जे पदार्थ असतात त्यात अधिक प्रमाणात प्रोसेस्ड फूड किंवा तयार पदार्थ, रेड मीट आणि डेअरी प्रॉडक्ट असतात. अशा आहाराने लठ्ठपणा, डायबिटीज, कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. ज्याने आयुष्य कमी होतं.

एक्सपर्ट्सनी सांगितलं की, जर परदेशात राहणारे लोकही चांगली डाएट फॉलो करतील आणि डाएटमध्ये कडधान्य, शेंगा आणि नट्सचा समावेश करतील तर ते लोक खराब आहार घेणाऱ्या लोकांच्या तुलनेत १३ वर्ष अधिक  जगू शकतात. 
बर्गन यूनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांना आढळलं की, जर एखादी ६० वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती डाएटमध्ये या पदार्थांचा समावेश करत असेल तर तेही त्यांचं आयुष्य साधारण ८.५ वर्षाने वाढवू शकतात. तेच जर ८० वर्षाच्या व्यक्तीने डाएटमध्ये या फूड्सचा समावेश केला तर ते त्यांचं आयुष्य ३.५ वर्षाने वाढवू शकतात.

२२५ ग्रॅम धान्य आणि २५ ग्रॅम ड्राय फ्रूट्स

रिसर्चमध्ये सामान्य यूरोपियन आणि अमेरिकी डाएटची तुलना कॉम्प्युटरच्या माध्यमातून करण्यात आली होती. रिसर्चरने सांगितलं की, जर कुणी २० वर्षाची व्यक्ती असेल जी कोणत्याच शेंगांचं सेवन करत नाही. जर त्याने दिवसातून २०० ग्रॅम शेंगा, एक वाटी डाळचं सेवन केलं तर त्याचं वय २.५ वर्षाने वाढेल. वेगवेगळ्या शेंगांमध्य प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. 

सोबतच एक्सपर्ट म्हणाले की, रेड आणि प्रोसेस्ड मीटचं सेवन बंद करा. कारण त्यात फॅट आणि मिठाचं प्रमाण अधिक असतं. जर हे पूर्णपणे खाणं बंद केलं तर तुम्ही चार वर्षे अधिक जगू शकता. या रिसर्चचे मुख्य लेखक आणि न्यूट्रिशन एक्सपर्ट प्राध्यापक लार्स फडनेस म्हणाले की, डाएट कॅलक्यूलेट केल्याने लोकांना चांगल्या प्रकारे डाएट घेण्यास मदत मिळू शकते. 
 

Web Title: Health Tips : Avoid red and processed meat for live longer and eat a diet rich in legumes lentils and nuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.