जंक फूड, प्रोसेस्ड फूड खायला आवडतं? आताच थांबा; कॅन्सरसह 'या' आजारांचा मोठा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 02:40 PM2024-06-09T14:40:29+5:302024-06-09T14:42:02+5:30
कोणत्या गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक आहेत आणि त्या खाल्ल्याने कोणते आजार होऊ शकतात हे जाणून घेऊया...
आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणं फार कठीण झालं आहे. असे काही लोक आहेत जे कामामुळे वेळ मिळत नाही तेव्हा बाहेरचे जंक फूड, प्रोसेस्ड फूड आणि गोड पदार्थ खाऊन पोट भरतात. पण असं केल्याने आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात. कोणत्या गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक आहेत आणि त्या खाल्ल्याने कोणते आजार होऊ शकतात हे जाणून घेऊया...
जंक फूड हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, त्यात फॅट आणि सोडियमचे प्रमाण जास्त असतं आणि पोषक तत्वांचं प्रमाण कमी असतं. याचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणा आणि कॅन्सर यांसारख्या मोठ्या आजारांचा धोका वाढतो.
प्रोसेस्ड फूड आरोग्यासाठी घातक
जे लोक प्रोसेस्ड फूड खातात त्यांच्या आरोग्यावरही घातक परिणाम होतात. मिळालेल्या माहितीनुसार, डिशेसला रंग देण्यासाठी प्रोसेस्ड फूडमध्ये कृत्रिम फ्लेवर्स आणि रसायनांचा वापर केला जातो, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानलं जातं.
कॅन्सरचा मोठा धोका
याच्या सेवनामुळे काही लोकांना एलर्जी, पचनाच्या समस्या आणि कॅन्सरसारख्या समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. जास्त गोड खाणाऱ्या लोकांना मधुमेह, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा यांसारखे आजार होऊ शकतात.
दारू आणि धूम्रपान टाळा
या गोड पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात, ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. एवढच नाही तर गोड पदार्थांमध्ये पोषक तत्वांची कमतरता असते, त्यामुळे आजार होऊ शकतात. दारू आणि धूम्रपान हे शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे.
किडनीचं नुकसान
दारू प्यायल्याने हृदय, मेंदू, लिव्हर आणि किडनी यांना हानी पोहोचू शकते. इतकंच नाही तर धूम्रपान आणि मद्यपानामुळे कॅन्सर आणि टीबीसारखे घातक आजारही होऊ शकतात. त्यामुळे फुफ्फुसांनाही हानी पोहोचू शकते.
या गोष्टी ठेवा लक्षात
या गोष्टी टाळण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहार घ्यावा. नियमित व्यायाम करा आणि दररोज किमान 7 ते 8 तास झोप घ्या. आता दिवसभरात 7 ते 8 ग्लास पाणी प्या, हे तुमचे शरीर हायड्रेट ठेवेल. तणाव कमी करा आणि या सर्व गोष्टींचे सेवन टाळा. जर तुम्हाला खूप त्रास होत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.