'या' ७ कारणांमुळे रोज ब्रश करूनसुद्धा तोंडातून सतत दुर्गंधी येते; 'अशी' मिळवा त्रासापासून सुटका
By Manali.bagul | Published: December 8, 2020 12:52 PM2020-12-08T12:52:47+5:302020-12-08T13:03:06+5:30
Health Tips In Marathi : आपल्या रोजच्या जीवनातील काही चुकीच्या सवयींमुळे या समस्यांचा सामना करावा लागतो. आज आम्ही या सवयींबद्दल सांगणार आहेत.
श्वासांमधून येणारा दुर्गंधी एक अशी समस्या आहे. ज्यामुळे लोकांना नेहमीच त्रासाचा सामना करावा लागतो. कधी कधी ही दुर्गंधी इतकी जास्त येते की, समोरच्या व्यक्तीशी बोलताना सुद्धा लाज वाटते. आपल्या रोजच्या जीवनातील काही चुकीच्या सवयींमुळे आपल्याला या समस्यांचा सामना करावा लागतो. आज आम्ही या सवयींबद्दल सांगणार आहेत. जेणेकरून तुम्ही काही गोष्टींची काळजी घेऊन या त्रासापासून सुटका मिळवू शकता.
अल्कोहोल
मद्यपान केल्याने तोंडातून दुर्गंधी येते. द्रव असूनही, मद्यपान केल्या नंतर तोंड कोरडे होते आणि यामुळे बॅक्टेरिया तयार होऊ लागतात. याला वैद्यकीय भाषेत हॅलिटोसिस म्हणतात. म्हणजे या बॅक्टेरियांमुळे होलिटोसिसची स्थिती तयार होते. याशिवाय कॉफी, मसालेदार अन्न आणि सिगारेट मुळे देखील कोरडे तोंड कोरडे होते. कोरड्या तोंडामुळे झोपेच्या वेळी लाळ तयार होत नाही ज्यामुळे श्वास वास येऊ लागतो.
जीभ
जीभेवर असणार्या बॅक्टेरियांमुळेही श्वासातून दुर्गंधी येते. यासाठी, दररोज ब्रश केल्यानंतर आपली जीभ स्वच्छ करणे महत्वाचे आहे. यासाठी प्लास्टिकऐवजी मेटल टिंग क्लीनर वापरा. यामुळे तुमची जीभ चांगली राहील व तोंडाला दुर्गंधी येणार नाही.
सर्दी
सर्दी किंवा ब्राँकायटिस सारख्या श्वसन संक्रमणांमुळे देखील श्वासांमधून दुर्गंधी येते. हे जीवाणू थंडीत तयार झालेल्या कफमध्ये असतात. जेव्हा नाक बंद होते, तेव्हा आपण तोंडातून श्वास घेतो, ज्यामुळे तोंड कोरडे होते आणि श्वासातून वास येतो.
ड्रायफ्रुट्स
काही ड्रायफ्रुट्स खूप गोड असतात ज्यावर बॅक्टेरिया सहज येतात. जसे 1/4 कप मनुक्यांमध्ये 21 ग्रॅम साखर असते, त्याच प्रमाणात वाळलेल्या जर्दाळूमध्ये 17 ग्रॅम साखर असते. तथापि, त्यामध्ये नैसर्गिक गोड पदार्थ असतात ज्यामुळे शरीराला फायदा होतो. बरेच ड्रायफ्रुट्स चिकट असतात आणि दातात अडकतात. यामुळे, श्वास वास येऊ लागतो. म्हणून ड्रायफ्रुट्स खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने ब्रश करा.
लो कार्ब डाएट
जे लोक कमी कार्ब आहार घेतात आणि जास्त प्रोटीन घेतात त्यांच्या श्वासांना सहसा वाईट वास येतो. यामागचे कारण असे आहे की अशा आहारात चरबी जाळण्याची प्रक्रिया केटोन नावाचे एक संयुग बनवते. केटोनमुळे श्वासांचा वास येतो. त्यासाठी थोड्या वेळात चिंगम चावणे चांगले ठरेल.
टॉन्सिल
बॅक्टेरिया, लहान अन्न कण, मृत पेशी आणि कफांपासून टॉन्सिल्स बनलेले असतात. ते आपल्या टॉन्सिलमध्ये आणि आपल्या जिभेच्या मागील बाजूस अडकतात. ते कोणतेही नुकसान करीत नाहीत, परंतु श्वासांमध्ये दुर्गंधी तयार करतात. आपल्याला ही समस्या असल्यास, अन्न खाल्ल्यानंतर, मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. घश्यातील सूज आणि वेदना असू शकतं 'या' आजाराचं लक्षणं; तज्ज्ञांनी सांगितले बचावाचे उपाय
पचनक्रियेची समस्या
कधीकधी आपण अशी गोष्ट खातो ज्या सहज पचत नाहीत. यामुळे, छातीत जळजळ होण्याची समस्या सुरू होते. या कारणांमुळे, तोंडात वास देखील येतो. म्हणून अशा गोष्टी खाणे टाळा जे पचविणे कठीण आहे. आनंदाची बातमी! 'या' देशात आजपासून सामान्यांना मिळणार कोरोनाची लस; भारतातही तयारीला सुरूवात