दुपारी किती वेळ झोपणं फायदेशीर असतं? जाणून घ्या नुकसान सुद्धा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 05:11 PM2023-09-15T17:11:01+5:302023-09-15T17:11:55+5:30
Health Tips : दुपारी जास्त वेळ झोपल्याने काय नुकसान होतात हे माहीत आहेत का? चला जाणून घेऊ काय सांगतो रिसर्च....
काही लोक थकवा किंवा सवयीमुळे दुपारी झोप घेतात. अनेकदा घर सांभाळणाऱ्या महिला घरातील काम संपवल्यावर दुपारी थोडावेळ झोपणं पसंत करतात. पण दुपारी किती वेळ झोप घेणं फायदेशीर असतं हे अनेकांना माहीत नसतं. तुम्हाला माहीत आहे का? दुपारी जास्त वेळ झोपल्याने काय नुकसान होतात हे माहीत आहेत का? चला जाणून घेऊ काय सांगतो रिसर्च....
दुपारी थोडा वेळ झोपण्याचे फायदे
आराम मिळतो
मूड चांगला म्हणजेच फ्रेश होतो
प्रतिक्रिया देण्याची क्षमता वाढते
स्मरणशक्तीत वाढ होते
सतर्कता वाढते
थकवा दूर होतो
दुपारी झोपण्याचे नुकसान
स्लीप इनर्शिया अशा स्थितीला म्हटलं जातं, ज्यात मनुष्य अर्धा जागा आणि अर्धा झोपेत असतो. या स्थितीत मनुष्याची विचार करण्याची, समजण्याची क्षमता कमी होऊ शकते. ही स्थित नेहमीच सामान्यपणे झोपेतून जागे झाल्यावर होऊ शकते.
दिवसा झोपल्या कारणाने तुम्हाला रात्री झोप न येण्याची समस्या होऊ शकते. जर तुम्हाला रात्री इंसोम्नियाची समस्या असेल किंवा झोप येत नसेल, तर दुपारी झोपल्याने ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
दुपारी किती वेळ झोप घ्यावी?
अभ्यासक Rajiv Dhand आणि Harjyot Sohal द्वारे नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, दिवसा केवळ ३० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळ झोप घेणंच फायदेशीर ठरू शकतं. यापेक्षा जास्त वेळ दुपारी झोपल्याने तुमच्या शरीराला नुकसान होऊ शकतं. त्यासोबतच एक्सपर्टचा सल्ला आहे की, तुम्ही दुपारी ३ वाजतानंतर अजिबात झोपू नये. याने तुम्हाला रात्री झोपण्यास समस्या येऊ शकते. सोबतच दुपारी पावर नॅप घेताना तुमच्या आजूबाजूला अंधार आणि शांत वातावरण असावं.