वजन कमी करायचंय? 'अॅपल टी'चे सेवन करा; तज्ज्ञांनी सांगितली नवी ट्रिक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 03:26 PM2024-07-09T15:26:00+5:302024-07-09T15:35:15+5:30
'अॅपल टी' एक भारी मॉर्निंग ड्रिंक! अॅपल टी प्यायल्याने शरीराला त्याचे अगणित फायदे मिळतात.
Health Tips : 'अॅपल टी' एक भारी मॉर्निंग ड्रिंक! अॅपल टी प्यायल्याने शरीराला त्याचे अगणित फायदे मिळतात. 'अॅपल टी' म्हणजे सफरचंद या फळापासून तयार केलेला चहा असतो. या खास चहाने वजन कमी होण्यासोबतच कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित राहते.
वजन कमी होते-
सफरचंद चहाचे सेवन वजन कमी करण्यासाठी खूप चांगले मानले जाते. यात खूप कमी कॅलरीज असतात. ज्यामुळे वजन वाढण्याची तक्रार नसते. याशिवाय त्यात फॅटचे प्रमाणही खूप कमी असते. त्याचा थेट परिणाम वजन कमी होण्यावर दिसून येतो.
कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो-
रोज सफरचंद चहाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते. यामध्ये असलेले फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स तुमच्या खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी खूप मदत करतात. सफरचंदाचा चहा पिऊनही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. या चहामुळे चयापचय संतुलन सुधारते. कारण त्यात अँटिऑक्सिडेंट तसेच फ्रुक्टोज असते, जी एक नैसर्गिक साखर आहे. सफरचंद चहाच्या मदतीने रक्तातील साखर वाढणे किंवा कमी होणे टाळता येते. लवंग, दालचिनी आणि इतर काही मसाल्यांच्या साहाय्याने तयार केलेला 'अॅपल टी' प्यायला चवदार तर लागतोच पण वजन कमी करण्यातही खूप फायदेशीर आहे.
पचनक्रिया सुधारते-
सफरचंदामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात सापडते. सफरचंदापासून तयार केलेली चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारते,असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात.
ब्लड प्रेशर कंट्रोल-
अॅंटीऑक्सिडेंट्स व्यतिरीक्त अॅपलमध्ये नॅच्युरल शुगर अशते. जी मेटाबॉलिज्ममध्ये सुधारणा करण्यासोबतच ब्लड प्रेशर नियंत्रित करते. ब्लड प्रेशरमध्ये अचानक होणारी वाढ 'अॅपल टी'ने रोखली जाते.
असा बनवा चहा-
अॅपलचा चहा तयार करण्यासाठी तुम्हाला १ अॅपल, ३ कप पाणी, १ चमचा लिंबाचा रस, २ टी बॅग आणि दालचीनी पावडरची या सामग्रीची गरज आहे.
कृती-
सर्वप्रथम एका भांड्यात पाणी आणि लिंबाचा रस टाका, नंतर त्यात टी बॅग टाका. काही वेळ या उकळी येऊ द्या. त्यानंतर कापलेले अॅपलचे तुकडे उकळत्या पाण्यात टाकावे. जवळपास ५ मिनिटे हे उकळू द्या. त्यानंतर यात दालचीनी पावडर टाका. चहामध्ये मिश्रित दालचीनी डीटॉक्सिफाय करण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करते.