Health Tips : रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत गुळाचं असं करा सेवन, फायदे वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 01:54 PM2022-02-15T13:54:08+5:302022-02-15T13:56:29+5:30

Benefits of eating Jaggery with warm water: काही दिवस तुम्ही कोमट पाणी पित असताना एक गुळाचा तुकडा खाऊन बघा. मग त्याचे काय फायदे होतात हे तुम्हाला दिसतील. चला जाणून घेऊया याचे इतरही फायदे.

Health Tips : Benefits of eating jaggery with warm water in empty stomach | Health Tips : रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत गुळाचं असं करा सेवन, फायदे वाचून व्हाल अवाक्

Health Tips : रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत गुळाचं असं करा सेवन, फायदे वाचून व्हाल अवाक्

googlenewsNext

Benefits of eating Jaggery with warm water: गूळ खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे. तेच जर तुम्ही गूळ कोमट पाण्यासोबत खाल्ला तर याचे शरीराला दुप्पट फायदे होतात. सकाळी गुळासोबत कोमट पाणी प्यायल्याने त्याचे अनेक फायदे होतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तर हा बेस्ट घरगुती उपाय मानला जातो. काही दिवस तुम्ही कोमट पाणी पित असताना एक गुळाचा तुकडा खाऊन बघा. मग त्याचे काय फायदे होतात हे तुम्हाला दिसतील. चला जाणून घेऊया याचे इतरही फायदे.

गुळामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात. जसे की, व्हिटॅमिन बी१, बी६, सी मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, आयर्न, ऊर्जा, शुगर, कार्बोहायड्रेट, सोडिअम इत्यादी. हे सगळे पोषक तत्व शरीराला कोणत्या ना कोणत्या प्रकारे फायदा पोहोचवतात. गुळामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असतं. ज्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते.

अजून काय होतात फायदे?

जेव्हा तुम्ही सकाळी एका ग्लास कोमट पाण्याचं सेवन करता तेव्हा याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. पण जेव्हा तुम्ही पाण्यासोबत एक तुकडा गूळ खाता किंवा पाण्यात मिश्रित करून पिता तेव्हा याचे फायदे अनेक पटीने वाढतात. याने पचनशक्ती योग्य होते. अॅसिडीटीच्या समस्येने तुम्ही हैराण असाल तर तुम्ही कोमट पाण्यात गूळ मिश्रीत करून पिऊ शकता. याने फायदा होईल. लूज मोशनची समस्या होत नाही. तसेच वजन कमी करण्यासही फायदा होतो.

कोमट पाणी आणि गूळ यांना आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी एक चांगलं औषध मानलं जात आहे. हे पाणी प्यायल्याने डायजेशन चांगलं होतं. सोबतच किडनी संबंधी समस्याही कमी होतात.

कोमट पाण्यासोबत गुळाचं पाणी प्यायल्यास शरीरात असलेले टॉक्सिन पदार्थ सहजपणे बाहेर निघतात. याने शरीर डिटॉक्सिफाय होतं.

गूळ कोमट पाण्यात मिश्रित करून खावा किंवा कोमट पाण्यात मिश्रित करू खावा. याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. सोबतच ऑक्सीडेटिव स्ट्रेससोबतही लढता येतं. याने शरीर शांत होतं.

कसं तयार कराल गूळ पाणी?

एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात एक तुकडा गूळ टाकून चांगल्या प्रकारे मिश्रित करा. हे हेल्दी ड्रिंक सकाळी रिकाम्या पोटी प्यावं. काही महिने याचं सेवन केलं तर तुमचं पोटंही कमी झालेलं दिसेल आणि शरीराला इतर फायदेही होतील. जर तुम्हाला गूळ पाण्यात टाकून प्यायचा नसेल तर तुम्ही गूळ असाच खावा आणि मग पाणी प्यावे. याने पोट साफ होतं. 

गूळ खाण्याचे फायदे

गुळात व्हिटॅमिन सी असल्याने याने रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होते. 

गूळ खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ सहजपणे बाहेर निघतात. कारण यात मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात जे अॅंटी-टॉक्सिक प्रभाव करतात.

जर तुमच्या शरीरात रक्तात कमतरता असेल तर गूळ खाल्ल्याने शरीरातील ब्लड सेल्स निर्माण होतात. याच्या कमतरतेने एनीमिया होतो. ज्याने थकवा, कमजोरी होऊ लागते. एनीमिया शरीरात आयर्नच्या कमतरतेमुळे होतो.

(टिप - वरील लेखातील माहिती किंवा घरगुती उपाय हे सामान्य माहितीवर आधारित आहे. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. मात्र, हे उपाय वर्षानुवर्षे आयुर्वेदिक उपाय म्हणून वापरले जातात. हे उपाय करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
 

Web Title: Health Tips : Benefits of eating jaggery with warm water in empty stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.