अपचन, सर्दी- खोकल्याने त्रस्त? आहारात गरम मसाला वापरा; आठवडाभरात दिसेल फरक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 03:55 PM2024-07-08T15:55:04+5:302024-07-08T16:07:33+5:30
भारतीय स्वयंपाकात वापरला जाणारा गरम मसाला हा फक्त स्वाद आणि रंगासाठीच नसतो तर गरम मसाल्याचा उपयोग आरोग्यासाठीही होत असतो.
Benefits of Of Garam Masala : भारतात वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जेवण बनवण्याची पद्धतीही भिन्न आहेत. शिवाय भारतीय खाद्य संस्कृतीमधील सर्वात खास बाब म्हणजे येथील मसाले. त्यातही जेवणाचा स्वादिष्ट आणि रुचकर बनवण्यासाठी गरम मसाले उपयुक्त ठरतात. पण भारतीय स्वयंपाकात वापरला जाणारा गरम मसाला हा फक्त स्वाद आणि रंगासाठीच नसतो तर गरम मसाल्याचा उपयोग आरोग्यासाठीही होत असतो.
आहारात गरम मसाल्याचा समावेश केल्यास पचनसंस्थेला अनेक फायदे मिळू शकतात. जर तुम्हाला पोट फुगण्याची समस्या असेल तर तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये आवश्यक आहे. हे केवळ भूकच वाढवत नाही तर गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यातही मोठी भूमिका बजावते. गरम मसाल्यामध्ये अनेक आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे ते तुम्हाला अनेक प्रकारच्या आजारांशी लढण्यात मदत करते.
गरम मसाले खाण्याचे फायदे-
शरीराच्या एकूण आरोग्याला चालना देण्यासाठी हे खूप खास मानले जाते.
१) गरम मसाला चयापचय वाढवण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. काळी मिरी, लवंग आणि जिरे यांच्या मदतीने शरीरातील अनेक अवयवांना फायदा होतो आणि शरीरातील अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरताही पूर्ण होते.
२) बदलत्या ऋतूंमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी गरम मसाला देखील खूप उपयुक्त आहे. हे तुम्हाला आजार आणि संक्रमण टाळण्यासाठी प्रतिकारशक्ती देते, तर सर्दी आणि खोकल्यामध्ये देखील याचे सेवन खूप प्रभावी मानले जाते.
३) गरम मसाल्यांमुळे पचनक्रिया सुधारून शरीरात गॅस्ट्रिक ज्यूस रिलिज करण्यास मदत करतात. शिवाय अपचनाची समस्या यामुळे दूर होते, असं आहारतज्ज्ञ सांगतात. एकंदरीत गरम मसाले डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी उत्तम ठरतात. यामुळे डायजेस्टिव्ह एंजाईम्स वाढतात आणि पोषक त्तव बाहेर येतात. इतकंच नाही तर ब्लोटिंगची समस्याही दूर होते.
४) तोंडातून येणाऱ्या दुर्गंधावरही गरम मसाला फायदेशीर ठरतो. लवंग दातांच्या समस्यांसाठी फायदेशीर समजले जाते. लवंगामध्ये अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असते.