दुधात चिमुटभर खसखस टाकून प्यायल्यास होतील हे आरोग्यदायी फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 05:38 PM2022-08-26T17:38:56+5:302022-08-26T17:41:12+5:30
Health Tips : आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे फारच गरजेचे आहे. यासाठी रोज दूध पिणे फायद्याचे ठरते. अशात जर दुधात खसखस मिश्रित करुन प्यायल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
Health Tips : आजच्या धावपळीच्या जीवनात बदलत्या लाइफस्टाईलमुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्या होत राहतात. भलेही या समस्या गंभीर नसल्या तरी कालांतराने या समस्या डोकं वर काढतात आणि मोठे आजार होतात. अशात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे फारच गरजेचे आहे. यासाठी रोज दूध पिणे फायद्याचे ठरते. अशात जर दुधात खसखस मिश्रित करुन प्यायल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
खसखसमध्ये ओमेगा 3 आणि ओमोगा 6 हे तत्व असतात. यासोबतच फॅटी अॅसिड, प्रोटीन, फायबर, थायमिन, कॅल्शिअम आणि मॅगनीज हे सुद्धा असतात. हे सर्वच पोषक तत्व तुम्हाला फिट राहण्यास मदत करतील.
1) गरमीच्या दिवसात दुधात खसखस मिश्रित करुन प्यायल्यास याने शरीराचं तापमान नियंत्रित राहतं. हे दूध शरीराला बाहेरील गरमीपासून सुरक्षा देतं.
2) थंडीमध्ये अशाप्रकारे दूध प्यायल्यास याने सर्दी-खोकला लगेच दूर होतो.
3) जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रोज दुधात खसखस मिश्रित करुन प्यायला हवं. खसखसमध्ये ओमोगा 3 फॅटी अॅसिड असतं जे वजन कमी करण्यात मदत करतं.
4) हे दूध पेनकिलर सारखंही काम करतं. कोणत्याही प्रकारची अंग दुखी असेल तर हे दूध प्यायल्यास तुम्हाला नक्की आराम मिळेल.
5) श्वासासंबंधी कोणतीही समस्या असेल तर खसखस टाकून दूध प्या. याने काही वेळातच आराम मिळेल.
6) ज्या लोकांना झोपेचा त्रास असेल म्हणजे झोप येत नसेल त्यांनी हे दूध आवर्जून प्यायला हवं. हे दूध रोज प्यायल्यास झोप चांगली येईल.
7) जर तुम्हाला पोटाचा काही त्रास असेल तर खसखस मिश्रित दूध तुम्हाला आराम देईल.
8) हायब्लड प्रेशरच्या रुग्णांनी खसखस मिश्रित दूध रोज सेवन करायला हवं. याने लवकर आराम मिळतो.
9) डिप्रेशनचा त्रास असणाऱ्यांनीही खसखस मिश्रित दूध प्यायला हवं.
10) शरीरात रक्ताची कमतरता असेल तर खसखस मिश्रित दूध घ्या.