चालाल तर चालाल! रोज फक्त ३० मिनिटे चालण्याचे मिळतील अद्भूत फायदे; राहाल स्लिम ट्रिम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 01:13 PM2024-07-04T13:13:16+5:302024-07-04T13:16:11+5:30
आपले मेटाबॉलिज्म वाढवायचे असेल तर चालणे हा सर्वांत सोपा उपाय आहे.
Health Tips : आपले मेटाबॉलिज्म वाढवायचे असेल तर चालणे हा सर्वांत सोपा उपाय आहे. ८ किमी प्रतितास किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने चालल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. विशेष म्हणजे केवळ १० मिनिटे चालल्यानेही शरीराला फायदा मिळतो. दररोज ६० मिनिटांपर्यंत चालल्याने शरीराला वेगवेगळे फायदे मिळतात.
चालणे हा एक व्यायामाचा उत्तम प्रकार मानला जातो. ज्यामुळे शरीराला असंख्य फायदे मिळतात. त्यासाठी नियमितपणे ३० मिनिटे पायी चालण्याचा सल्ला हेल्थ एक्सपर्ट देतात.पायी चालणे किंवा जॉगिंग केल्याने शरीर अॅक्टिव्ह राहते. शिवाय दिवसभरात कामे करताना कोणताही थकवा जाणवत नाही.
रोजच्या चालण्यामध्ये सातत्य ठेवल्याने मानसिक स्वास्थ्य देखील सुधारते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पायी चालण्यासाठी तुम्हाला निश्चित अशी वेळ ठरवण्याची काहीच गरज पडत नाही. तुम्ही कामावर जाताना अथवा बाजारात एखादी वस्तू खरेदी आणण्याकरिता जायचे असेल तर गाडी ऐवजी चालण्याचा प्रयोग करु शकता.
चालण्याचे फायदे-
१) नियमितपणे १० मिनिटे चालल्याने फास्टिंग आणि पोस्ट मील ब्लड ग्लुकोजमध्ये सुधारणा होते. रात्री भोजनानंतर चालल्यास ते अधिक फायदेशीर ठरते.
२) टाइप-२ मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज किमान ५००० पावलं चालले पाहिजे.
३) दररोज २० मिनिटे जलद ३ चालल्याने मायटोकॉन्ड्रियाच्या कार्यप्रणालीत वेगाने सुधारणा होऊन रक्तदाब नियंत्रणात राहतो.