आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 03:18 PM2024-05-30T15:18:45+5:302024-05-30T15:19:42+5:30
उन्हाळ्यात आपण AC लावतो. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. पण काही लोकांसाठी AC ची हवा ही घातक ठरू शकते.
उन्हाळ्यात आपण AC लावतो. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. पण काही लोकांसाठी AC ची हवा ही घातक ठरू शकते. दमा असलेल्या रुग्णांनी काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यात सतत ACमध्ये राहिल्याने फुफ्फुसाचं नुकसान होऊ शकते. दम्याचे रुग्ण एसी रुममध्ये जास्त वेळ बसले असतील तर त्यांनी काही खास गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
उन्हाळ्याच्या दिवसात बरेच लोक एअर कंडिशनर म्हणजेच एसी वापरतात. घरापासून ऑफिसपर्यंत लोकांचा जास्तीत जास्त वेळ एसीमध्ये जातो. वातानुकूलित हवा दमा रुग्णांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. दम्याच्या रुग्णासाठी एसी धोकादायक का आहे? हे जाणून घेऊया...
दमा हा श्वसनासंबंधित एक प्रकारचा आजार आहे. या आजारात श्वसनमार्गाला सूज आणि फुफ्फुसात संसर्ग होतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. एसीमध्ये सतत बसल्यामुळे रुग्णांच्या समस्यांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते.
उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी लोक एसीचा वापर करतात जे अस्थमाच्या रुग्णासाठी धोकादायक ठरू शकतं. जेव्हा एसी रूममध्ये असलेले कण हवेत मिसळतात आणि श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करतात तेव्हा फुफ्फुसांचं मोठं नुकसान होतं. दम्याचा रुग्ण एसी रुममध्ये बसला तर त्याच्या समस्या वाढू शकतात. यामुळे त्यांना दम्याचा अटॅकही येऊ शकतो. त्यामुळे दम्याच्या रुग्णाने एसीमध्ये बसताना काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
सतत एसीमध्ये बसत असाल तर 'ही' खबरदारी घ्या
- एसीमध्ये बसल्यास घर स्वच्छ ठेवा.
- घरात थोडीशी धूळ किंवा घाणही नसावी.
- एसी स्वच्छ करण्याची विशेष काळजी घ्या.
- एसी फिल्टर स्वच्छ ठेवा.
- एसीचे तापमान नेहमी २५ अंश सेल्सिअस ठेवा.
- तुम्ही नवीन एसी घेणार असाल तर प्युरिफायर घ्या.
- दम्याचे रुग्ण एसीमध्ये बसल्यास त्यांनी मास्क लावावा.