सकाळी रिकाम्या पोटी कडूलिंबाची पाने खाऊन मिळतात हे जबरदस्त फायदे, वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 10:36 AM2023-09-02T10:36:48+5:302023-09-02T10:36:59+5:30

सकाळी रिकाम्या पोटी जर कडूलिंबाच्या पानांचं सेवन केलं तर शरीरातील अर्धे आजार दूर होतील. 

Health Tips : Chewing neem leaves on an empty stomach benefits control blood sugar level, acidity | सकाळी रिकाम्या पोटी कडूलिंबाची पाने खाऊन मिळतात हे जबरदस्त फायदे, वाचून व्हाल अवाक्...

सकाळी रिकाम्या पोटी कडूलिंबाची पाने खाऊन मिळतात हे जबरदस्त फायदे, वाचून व्हाल अवाक्...

googlenewsNext

आयुर्वेदाच्या दृष्टीने कडूलिंबाला फार महत्व आहे. कडूलिंबाची चव भलेही कडू असेल, पण याने आरोग्याला कितीतरी फायदे होतात. आयुर्वेदानुसार, सकाळी रिकाम्या पोटी जर कडूलिंबाच्या पानांचं सेवन केलं तर शरीरातील अर्धे आजार दूर होतील. 

रिकाम्या पोटी कडूलिंबाची पाने खाण्याचे फायदे

1) ब्लड शुगर कंट्रोल

चुकीच्या लाइफस्टाईलमुळे भारतात सतत डायबिटीसच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. आजही बरेच लोक घरगुती उपायावर विश्वास ठेवतात. याच घरगुती उपयांपैकी एक म्हणजे सकाळी कडूलिंबाची पाने खाणे. असं केल्याने बल्ड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते.

2) रक्त शुद्ध होतं

कडूलिंबामध्ये असे औषधी गुण असतात जे शरीरातील रक्त शुद्ध करतात. याने रक्तातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. जर रक्त शुद्ध राहिलं तर तुम्हाला कोणते आजारही होणार नाहीत. 

3) पोटासाठी फायदेशीर

कडूलिंब केवळ आपल्या त्वचेसाठीच नाही तर पोटोसाठीही फायदेशीर ठरतो. यातील काही गुणांमुळे अॅसिडिटीची समस्या दूर होते. सकाळी रिकाम्या पोटी कडूलिंबाची पाने पाण्यात उकडून हे पाणी प्यायल्याने अॅसिडिटी आणि पोटदुखीची समस्या दूर होते.

4) इम्यूनिटी

कडूलिंबाच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. जे आपली इम्यूनिटी बूस्ट करण्यास मदत करतात. केवळ इतकंच नाही तर सर्दीसारखी समस्याही याने दूर होते.

Web Title: Health Tips : Chewing neem leaves on an empty stomach benefits control blood sugar level, acidity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.