Health Tips : ​कानाची सफाई करा ‘या’ सोप्या उपायांनी !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2017 11:44 AM2017-04-25T11:44:48+5:302017-04-25T17:14:48+5:30

आपल्या शरीराचा कान हा नाजूक अवयव असून त्याची काळजी घेणे तेवढेच गरजेचे आहे. कानात मळ जमल्यास तो साफ केला नाही तर खाज येणे, जळजळ होणे आदी समस्या निर्माण होतात

Health Tips: Clean the ear with these easy remedies! | Health Tips : ​कानाची सफाई करा ‘या’ सोप्या उपायांनी !

Health Tips : ​कानाची सफाई करा ‘या’ सोप्या उपायांनी !

googlenewsNext
ong>-Ravindra More
आपल्या शरीराचा कान हा नाजूक अवयव असून त्याची काळजी घेणे तेवढेच गरजेचे आहे. कानात मळ जमल्यास तो साफ केला नाही तर खाज येणे, जळजळ होणे आदी समस्या निर्माण होतात. मात्र साफ करताना कानाला इजा होणार नाही याची दक्षतादेखील घ्यावी. 

कान कसा साफ कराल?
* मिठाचे पाणी
गरम पाण्यात मीठ घोळून टाकून त्याचे काही थेंब कानात टाका आणि काही सेकंदात ते बाहेर काढा. 
 
* तेल
आॅलिव्ह, शेंगदाणा किंवा मोहरीचं तेल गरम करुन कानात टाकणे हा देखील सोपा उपाय आहे. तेलात जरासं लसूण टाकला तरी चालतो. यामुळे मळ बाहेर पडतो.

* कोमट पाणी
कापूस घेऊन तो पाण्यात भिजवून त्याने पाणी कानात टाका. काही सेकंदात पाणी बाहेर काढा.

* हायड्रोजन पॅरॉक्साइड 
अतिशय कमी प्रमाणात हायड्रोजन पॅरॉक्साइड घेवून तो पाण्यात टाका. थोड्या प्रमाणात ते कानात टाका आणि आता कान उलटून काही सेकंदात ते बाहेर काढा.

* कांद्याचा रस
कांदा वाफेवर शिजवून किंवा भाजून याचा रस काढून घ्या. त्यानंतर कापसाने रसाचे काही थेंब कानात टाका. याने मळ बाहेर पडतो.

Web Title: Health Tips: Clean the ear with these easy remedies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.