फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या चपातीचे हे आहेत दुष्परिणाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 11:48 AM2018-07-18T11:48:53+5:302018-07-18T11:49:20+5:30
भलेही तुम्ही कणिच चांगली राहण्यासाठी ठेवता पण फ्रिजचं तापमान खूप कमी असल्याने या कणकेमध्ये अनेकप्रकारचे बॅक्टेरिया आणि धोकादायक केमिकल्स तयार होतात.
(Image Credit: www.doctorshealthpress.com)
आजच्या धावपळीच्या जीवनात सकाळी लवकर ऑफिसला जाता यावं किंवा सकाळी उशीर होऊ नये म्हणून रात्रीच सकाळची बरीच तयारी करून ठेवली जाते. त्यात कणिकही रात्री मळून फ्रिजमध्ये ठेवली जाते. जेणेकरून वेळ वाचावा. पण मळून फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेमुळे तुम्हाला अनेक आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. भलेही तुम्ही कणिच चांगली राहण्यासाठी ठेवता पण फ्रिजचं तापमान खूप कमी असल्याने या कणकेमध्ये अनेकप्रकारचे बॅक्टेरिया आणि धोकादायक केमिकल्स तयार होतात.
काय होऊ शकते समस्या?
१) फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या चपात्या भलेही तुम्हाला चवीला चांगल्या लागत असतील, पण यामुळे तुम्हाला पोटासंबंधी अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो.
२) फ्रिजमधील कणकेच्या चपात्या खाल्याने पोटदुखीची समस्या होऊ शकते. त्यामुळे असे करणे शक्यतो टाळा.
३) पचनक्रिया बिघडणे आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होणे यामागेही फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक वापरणे हे कारण असू शकतं.
फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भातही हानिकारक
भात हा रूम टेम्प्रेचरमध्ये किंवा तो पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यात असणारे बॅक्टेरिया अधिक वाढतात. यामुळे भात खराब होता. त्यामुळे जास्त शिळा भात खाल्याने डायरिया, उल्टी, पोटदुखी, फूड पॉयझनिंग इत्यादी समस्या होऊ शकतात.
थकवा आणि आळस
शिळं अन्न खाल्याने तुम्हाला थकवा आणि आळस येऊ शकतो. अन्न खराब होऊ नये म्हणून तुम्ही ते फ्रिजमध्ये ठेवता पण तापमान कमी असल्याने त्यातील पोषक तत्व नष्ट होतात. जेवण करण्याचा मुख्य उद्देशच हे पोषक तत्व मिळवणे आहे. जे तुम्हाला दिवसभर काम करण्याची ऊर्जा देतात. पण शिळं फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न खाल्यास ते शरीराला मिळत नाहीत.