Health Tips: लिंबू, मध, गरम पाण्याचे सेवन आयुर्वेदाला अमान्य; वाचा योग्य पद्धती!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 01:11 PM2024-03-14T13:11:54+5:302024-03-14T13:12:28+5:30

Health Tips: सध्या लोकांची सकाळ लिंबू, मध, पाण्याने होते; त्याचे सेवन चुकीचे नाही, पण योग्य पद्धत काय ते जाणून घ्या!

Health Tips: Consumption of lemon, honey, hot water is not acceptable to Ayurveda; Read the correct method! | Health Tips: लिंबू, मध, गरम पाण्याचे सेवन आयुर्वेदाला अमान्य; वाचा योग्य पद्धती!

Health Tips: लिंबू, मध, गरम पाण्याचे सेवन आयुर्वेदाला अमान्य; वाचा योग्य पद्धती!

सद्यस्थितीत सगळेच जण वजन नियंत्रणावर मार्गदर्शन करू लागले आहेत, त्यात सुरुवात होते ती मध, लिंबू, गरम पाण्याने! या तिन्ही घटकांचे स्वतंत्र अस्तित्त्व शरीरासाठी लाभदायी आहे, पण आयुर्वेदानुसार या तिन्ही गोष्टी एकत्र घेऊ नये असे म्हटले जाते. डॉ. अमित भोरकर यांनी दिलेल्या माहितीतून ते जाणून घेऊ. 

आयुर्वेदामध्ये आपल्याला मधाबद्दल अनेक गोष्टी लिहिलेल्या सापडतात. आचार्य चरक आणि आचार्य सुश्रुत यांनी देखील मधाबद्दल खूप काही लिहून ठेवलेले आहे.जसे की मध किती प्रकारचे असतात, कोणत्या माशांनी बनवलेला मध चांगला असतो, मधाचे गुणधर्म, मधाचे सेवन कोण करायला हवे तसेच कोण करू नये, कोणत्या परिस्थितीमध्ये मध खाऊ नये, त्याचे प्रमाण किती असावे या सर्व गोष्टींबाबत आयुर्वेदामध्ये आपल्याला वर्णन पाहायला मिळते.

आचार्य सुश्रुत मधाबद्दल सुश्रुत सूत्रस्थान ४५ अध्याय १३२ मध्ये लिहितात की-

मधु तु मधुरं कषायानुरसं रूक्षं शीतमग्निदीपनं वर्ण्यं स्वर्यं लघु सुकुमारं लेखनं हृद्यं वाजीकरणं सन्धानं शोधनं रोपणं सिंग्राहि चक्षुष्यं प्रसादनं सूक्ष्ममार्गानुसारि पित्तश्लेष्ममेदोमेहहिक्काश्वासकासातिसारच्छर्दितृष्णाकृ-मिविषप्रशमनं ह्लादि त्रिदोषप्रशमनं च तत्तुलघुत्वात् कफघ्नं पैच्छिल्यान्माधुर्यात् कषायभावाच्च वातपित्तघ्नम् ||

याचा अर्थ असा की मध हा चवीने मधुर म्हणजेच गोड आहे. आपल्या शरीरातील अग्नी वाढवणारा, बल वाढवणारा, पचनासाठी हलका, हृदयासाठी अतिशय उपयुक्त, शरीरावरील व्रण कमी करणारा, डोळ्यांसाठी उपयुक्त, शरीरातील अति सूक्ष्म भागामध्ये प्रवेश करणारा, पित्त आणि कफ कमी करणारा, शरीरातील मेद कमी करणारा प्रमेह,अतिसार,श्वास,तृष्णा,कृमी यांना कमी करणारा तसेच स्त्री दोषांना संतुलित करणारा आहे. मध लघु गुणाचा असल्यामुळे तो शरीरातील कफाचा नाश करतो तसेच मधुर आणि कशा रस असल्यामुळे वात आणि पित्ताचा नाश करतो. मधमाशीच्या पोळ्यातील मध हा वात पित्त आणि कफ वाढवणारा असतो. त्यामुळे कच्चा स्वरूपातील मध कधीही वापरू नये,मध हा नेहमी जुना असावा.

आता आपण पाहूयात सकाळी गरम पाण्याबरोबर मध कसा घ्यावा –
एका भांड्यामध्ये पाणी घ्यावे. ते पाणी उकळून उकळून अर्ध्यापेक्षा कमी होऊ द्यावे. नंतर ते पाणी थंड होऊ द्यावे पाणी सामान्य तापमानाला आल्यावर मगच त्यामध्ये मध टाकावा. पाणी उकळून थंड होऊ दिल्यास ते पचनास अतिशय हलके होते व आपल्या शरीरातील कफ कमी करण्यास पर्यायी शरीराची चरबी कमी करण्यास मदत करते.

महर्षी सुश्रुत मध कसा घेऊ नये याबद्दल देखील खालील प्रमाणे लिहितात.

उष्णैर्विरुध्यते सर्वं विषान्वयतया मधु
उष्णार्तमुष्णैरुष्णे वा तन्निहन्ति यथा विषम्
तत्सौकुमार्याच्च तथैव शैत्यान्नानौषधीनां रससंभवाच्च
उष्णैर्विरुध्येत विशेषतश्च तथाऽन्तरीक्षेण जलेन चापि ||

म्हणजेच मध कधीही गरम करू नये किंवा कुठल्याही गरम पदार्थांमध्ये मध मिक्स करू नये. एवढेच नाही तर जे उष्ण ऋतू असतात त्या ऋतूमध्ये सुद्धा मध खाणे आपल्या शरीराला अपायकारक ठरू शकते. तसेच ज्यांना उष्णतेमुळे काही आजार उद्भवले असतील त्यांनी सुद्धा मधाचे सेवन करू नये.

चरक संहिता सूत्रस्थान २७ मध्ये आचार्य चरक यांनी सांगितले आहे की गरम मध हे मृत्यूचे कारण ठरू शकते. मधमाशांनी मध हा विविध ठिकाणाहून गोळा केलेला असतो त्यातील काही फुले विषारी देखील असतात, त्याचे गुणधर्म हे मधामध्ये सुद्धा काही प्रमाणात उतरता. म्हणून उष्ण मध हा आपल्यासाठी अहितकारक असतो. मध नेहमी कमी प्रमाणात घ्यायला हवा, मध जास्त खाल्ल्यास त्याचे पचन व्यवस्थित होत नाही व आपल्याला त्रास होऊ शकतो.

म्हणून जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यामध्ये मध टाकून घेत असाल तर वरील काळजी घेणे खूप गरजेचे आहे कधीही गरम पाण्यामध्ये मत टाकू नका ते पाणी आधी थंड होऊ द्या नंतरच मध मिक्स करून ते तुम्ही पिवू शकता. वजन कमी करण्यासाठी मध तुम्हाला सहाय्यता नक्की करेल पण फक्त मदत खाल्ल्याने वजन कमी होणार असे नाही तर तुम्हाला तुमच्या जीवनशैली खाणे पिणे व्यवस्थित झोप ताणतणाव या गोष्टींकडे देखील लक्ष द्यावे लागेल. त्यावेळी तुम्ही अगदी सहजरित्या तुमच्या वजन कमी करू शकाल.

Web Title: Health Tips: Consumption of lemon, honey, hot water is not acceptable to Ayurveda; Read the correct method!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.