रक्षाबंधनाला डायबिटीसची विशेष काळजी घ्या, अन्यथा ऐन सणातच भोगावे लागतील गंभीर दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 01:36 PM2021-08-18T13:36:09+5:302021-08-18T13:44:00+5:30

या सणाच्या काळात मधुमेहाचा आजार असलेल्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणूनच, मधुमेह असलेले लोक रक्षाबंधनाच्या या दिवशी आपल्या रक्तातील साखरेची पातळी कशी नियंत्रित ठेवू शकतात ते पाहू या...

health tips for diabetes patient during Rakshabandhan, how to control your sugar during festivals | रक्षाबंधनाला डायबिटीसची विशेष काळजी घ्या, अन्यथा ऐन सणातच भोगावे लागतील गंभीर दुष्परिणाम

रक्षाबंधनाला डायबिटीसची विशेष काळजी घ्या, अन्यथा ऐन सणातच भोगावे लागतील गंभीर दुष्परिणाम

Next

 'कुछ मीठा हो जाये,' म्हणत या भाऊ बहिणीला रक्षाबंधनाचे गिफ्ट देईल. बहिणही गोडाचा घास भरवत भावाचे तोंड गोड करेल. या सणात घरातील आबालवृद्ध या गोडावर यथेच्छ ताव मारतात. त्यावेळी अनेकांना विसर पडतो, की आपल्याला डायबीटीस आहे. औषध, गोळ्या तर नीट घेतोच आहे अशा अनेक सबबी सांगून अनेक जण  पथ्ये मोडतात, त्यामुळे त्यांच्या रक्तातील साखर वाढण्याचा धोका संभवतो. 

या दिवशी लोक भेटवस्तूंमध्ये एकमेकांना मिठाईचा बॉक्सही भेट देतात. या सणाच्या काळात मधुमेहाचा आजार असलेल्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणूनच, मधुमेह असलेले लोक रक्षाबंधनाच्या या दिवशी आपल्या रक्तातील साखरेची पातळी कशी नियंत्रित ठेवू शकतात ते पाहू या...

तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर दिवाळीतही रक्तातील साखरेची पातळी सतत तपासून पहा. कारण या काळात तुम्ही जे पदार्थ खायाल नकोत असे पदार्थ अधिक प्रमाणात खात असता.

उत्सवावेळी आरोग्याचा त्रास टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बदाम, अक्रोड, काजू यासारखे आरोग्यदायी पर्दाथ खाणं. सण-उत्सवाच्या वेळी आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. साध्या पाण्याऐवजी आपण नारळपाणी, ताक देखील पिऊ शकता. परंतु चहा-कॉफी, अल्कोहोल आणि कार्बोनेटेड पेयांपासून दूर रहा.

तुम्हाला मधुमेह असल्यास फॅट दुधाऐवजी स्किम्ड दुधाची मिठाई घरी बनवा. साखरेऐवजी गूळ वापरा. याशिवाय तुम्ही तळलेल्या अन्नाऐवजी बेक्ड आणि ग्रील्ड फूडचा पर्याय देखील घेऊ शकता.

उत्सवाच्या निमित्तानं औषधांकडे दुर्लक्ष करू नका. नियमितपणे आपली औषधे घ्या, व्यायाम करा जेणेकरून आपली तणावाची पातळी कमी होईल आणि आपण उत्सवाचा मुक्तपणे आनंद घेऊ शकाल.

सणासुदीच्या या काळात लोक मोठ्या प्रमाणात गोड, तळलेले आणि भाजलेले पदार्थ खातात. सण असल्याने स्त्रिया देखील दिवसभर स्वयंपाकाच्या तयारीमुळे तणावग्रस्त असतात. बऱ्याचदा त्या उपाशी राहतात. उपवास केल्याने हायपोग्लेसीमिया आणि अशक्तपणा होतो. यामुळे देखील साखरेची पातळी वाढते.

Web Title: health tips for diabetes patient during Rakshabandhan, how to control your sugar during festivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.