Health Tips : आपल्यालाही आहे कमी पाणी पिण्याची सवय? तर सावध व्हा, हे आजार करू शकतात अ‍ॅटॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 06:34 PM2022-08-17T18:34:01+5:302022-08-17T18:35:07+5:30

Disadvantages of drinking less water​​ : पाणी न प्यायल्याने अथवा फार कमी प्रमाणात पाणी प्यायल्याने कोणकोणत्या आजारांचा सामना करावा लागू शकतो, जाणून घ्या...

health tips Disadvantages of drinking less water​​ these diseases can be caused by drinking less water | Health Tips : आपल्यालाही आहे कमी पाणी पिण्याची सवय? तर सावध व्हा, हे आजार करू शकतात अ‍ॅटॅक

Health Tips : आपल्यालाही आहे कमी पाणी पिण्याची सवय? तर सावध व्हा, हे आजार करू शकतात अ‍ॅटॅक

googlenewsNext

योग्य प्रमाणात पाणी पिणे किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच माहीत आहे. कारण पाणी न प्यायल्याने अथवा खूपच कमी पाणी प्यायल्याने शरीर डिहायड्रेड होते. आपल्या शरीरात जवळपास 60 टक्के पाणी असते. त्यामुळे शरीराच्या सर्व अवयवांचे कार्य व्यवस्थित रित्या चालावे यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे आपले शरीर अनेक आजारांपासून दूर राहते. तर, पाणी न प्यायल्याने अथवा फार कमी प्रमाणात पाणी प्यायल्याने कोणकोणत्या आजारांचा सामना करावा लागू शकतो, यासंदर्भात जाणून घेऊयात...

फार कमी पाणी प्यायल्याने होऊ शकतात हे आजार - 
लठ्ठपणाची समस्या -

लठ्ठपणामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. कमी पाणी पिणे म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण देण्यासारखे आहे. तसेच, आपण अनेक वेळा योग्य प्रमाणात खातो, पण पाणी मात्र, फारच कमी पितो. यामुळे नेहमीच भूक लागल्यासारखे होते आणि आपण अनेक वेळा अधिक खातो. परिणामी लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. यामुळे शरिरात योग्य प्रमाणावर पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. 

पेटाच्या समस्या - 
कमी पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते. पाणी कमी प्यायल्याने ही समस्या वाढूही शकते. कारण पाण्याच्या कमतरतेमुळे पोटात अॅसिड तयार होण्याचा वेग वाढतो, यामुळे पोटात गॅस तयार होतो. याशिवाय कमी पाणी प्यायल्याने छातीत जळजळ होण्याची समस्याही होऊ शकते. 

तोंडाचा वास येणे - 
पाणी कमी प्यायल्याने तोंडाचा वास येण्याची समस्याही मोठ्या प्रमाणावर वाढते. कम पाणी प्यायल्याने तोंडाला कोरड पडते. यामुळे तोंडात बॅक्टेरिया तयार होतात. यामुळे तोंडाचा वास येऊ लागतो. यामुळे तोंडाचा वास येऊ नये म्हणून पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.

Web Title: health tips Disadvantages of drinking less water​​ these diseases can be caused by drinking less water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.