Health Tips : ​वर्कआउटनंतर कदापी करु नका ‘या’ चुका !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 12:27 PM2017-08-24T12:27:05+5:302017-08-24T17:57:05+5:30

आपणही वर्कआउट करत असाल आणि अपेक्षित फायदा होत नसेल तर कदापी आपल्याही लक्षात येत नसतील अशा चुका आपण करत असाल. चला जाणून घेऊया वर्कआउटनंतर कोणत्या चुका करु नये.

Health Tips: Do not do any work at the workout, 'This' is wrong! | Health Tips : ​वर्कआउटनंतर कदापी करु नका ‘या’ चुका !

Health Tips : ​वर्कआउटनंतर कदापी करु नका ‘या’ चुका !

Next
न कमी करण्यासाठी आणि बॉडी बनविण्यासाठी सेलिब्रिटींसह बहुतांश लोक जिममध्ये जाऊन तासंतास मेहनत घेतात. मात्र जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर बऱ्याच चुका केल्या जातात, त्यामुळे केलेली सर्व मेहनत वाया जाते. आपणही वर्कआउट करत असाल आणि अपेक्षित फायदा होत नसेल तर कदापी आपल्याही लक्षात येत नसतील अशा चुका आपण करत असाल. चला जाणून घेऊया वर्कआउटनंतर कोणत्या चुका करु नये.  

* वर्कआउटनंतर वेळेवर आणि हेल्दी खाणे खूपच आवश्यक असते. वर्कआउटनंतर पोष्टिक आहार घेणे सकाळचा नाश्ता घेण्याइतकेच महत्त्वपूर्ण असते. काही लोक एक्झरसाइजनंतर योग्य आहार घेत नाहीत, ज्याकारणाने शरीर कमजोर होते. त्यामुळे दररोज जिममधून आल्यानंतर प्रोटीन शेकचे सेवन अवश्य करावे. याशिवाय अंडे, फळ आणि हिरवा भाजीपालादेखील घेऊ शकता.   

* काही लोक जिममध्ये घाम गाळल्यानंतर बऱ्याच वेळापर्यंत काहीच सेवन करीत नाही. मात्र यामुळे शरीराला फायद्याऐवजी नुकसानच जास्त होते. एक्झरसाइजनंतर शरीरात काही पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होते जी पूर्ण करण्यासाठी पोषक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक असते. 
 
* शरीराचे वजन वाढू नये म्हणून बरेचजण गोड खाणे बंद करुन देतात. मात्र शरीराला जशी पोषक पदार्थांची आवश्यकता त्याचपद्धतीने शरीराची कार्यप्रणाली सुरळीत राहण्यासाठी फॅटदेखील आवश्यक असते. यासाठी आहारात गोड पदार्थांचाही समावेश असावा.  

* वजन कमी करण्याच्या प्रयत्नात बरेच लोक जेवणाचे प्रमाण खूपच कमी करतात आणि काही लोक बॉडी बनविण्यासाठी जास्त आहार घेतात. या दोन्हीही सवयी चुकीच्या असून यामुळे शरीरास नुकसान पोहचू शकते.   

Also Read : ​HEALTH : ​वर्कआऊटनंतर मांसपेशीतील वेदना दूर करण्यासाठी ‘हे’ आहेत प्रभावी उपाय !
                  : ​FITNESS : ​जिममध्ये मेहनत घेतल्यानंतर कोणत्या हेल्थ ड्रिंक्स घ्यायच्या माहित आहे का?

Web Title: Health Tips: Do not do any work at the workout, 'This' is wrong!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.