घरात सगळ्यांचे टूथब्रश एकाच पॉटमध्ये ठेवता का? मग हे वाचाच...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 02:20 PM2023-08-21T14:20:04+5:302023-08-21T14:21:55+5:30

Teeth Health Tips : दात आणि शरीर निरोगी ठेवायचं असेल तर टूथब्रशची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. तो कुठे ठेवावा, कसा ठेवावा या गोष्टी फार सामान्य वाटत असल्या तरी त्याबाबत निष्काळजी करुन चालणार नाही.

Health Tips : Do not keep all toothbrushes together know the reason | घरात सगळ्यांचे टूथब्रश एकाच पॉटमध्ये ठेवता का? मग हे वाचाच...

घरात सगळ्यांचे टूथब्रश एकाच पॉटमध्ये ठेवता का? मग हे वाचाच...

googlenewsNext

Teeth Health Tips : टूथब्रश हा आपल्या दैनंदिन कामातील महत्त्वाचा भाग आहे. अभ्सासकांचं म्हणनं आहे की, ब्रशची योग्यप्रकारे स्वच्छता न केल्यास टूथब्रश घरातील तिसरी सर्वात घाण असलेली जागा बनू शकतो. घाणेरड्या टूथब्रशने डायरिया किंवा स्कीन इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतो. अशावेळी दात आणि शरीर निरोगी ठेवायचं असेल तर टूथब्रशची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. तो कुठे ठेवावा, कसा ठेवावा या गोष्टी फार सामान्य वाटत असल्या तरी त्याबाबत निष्काळजी करुन चालणार नाही.

टूथब्रश भिजवू नका

जास्तीत जास्त लोक हे आधी टूथब्रश भिजवतात आणि मग त्यावर टूथपेस्ट लावतात. ब्रश भिजवल्यानंतर त्याचे दाते नरम होतात. पण असे केल्याने ब्रशची दात चांगल्याप्रकारे स्वच्छ करण्याची क्षमता कमी होते. असं न करण्याचा डॉक्टरही सल्ला देतात कारण अशाने टूथब्रश खराब होतो. तसेत भिजलेल्या टूथब्रशवर टूथपेस्ट लावल्याने पेस्टचा प्रभावही कमी होतो. त्यामुळे दात स्वच्छ करण्याआधी टूथब्रश भिजवू नका आणि जर तसे करणे गरजेचेच आहे तर १ सेंकदापेक्षा जास्त तो पाण्याखाली धरु नका.

टॉयलेटमध्ये ठेवू नका

अनेक घरांमध्ये टॉयलेट आणि टूथब्रश ठेवण्याची जागा फारच जवळ असते. टॉयलेटमध्ये फ्लश केल्यावर अनेक किटाणू उडतात आणि ते सहजपणे आजूबाजूच्या वस्तूंवर सहज जाउन बसतात. त्यात ब्रशही असतो. त्यामुळे ब्रश कधीही टॉयलेटच्या आजूबाजूला ठेवू नये. ज्या बॉक्समध्ये टूथब्रश ठेवता तो बॉक्स आठवड्यातून एकदा नक्की स्वच्छ करा. असे केल्याने त्यातील बॅक्टेरिया ब्रशमध्ये जाणार नाहीत. 

बंद करुन ठेवू नका

आजकाल बाजारात ब्रशसोबत त्याचे दाते झाकून ठेवण्यासाठी वेगवेगळे बॉक्सेस मिळतात. पण ब्रश अशाप्रकारे बंद करुन ठेवणे योग्य नाहीये. याने ब्रशमधील किटाणू वाढतात. सोबतच टूथब्रशचा वापर करुन झाल्यावर तो सरळ उभा ठेवा. याने ब्रशमधील पाणी खाली जाईल आणि ब्रश लगेच कोरडा होईल. याने ब्रशमध्ये किटाणू वाढण्यासाठी लागणारा ओलावाही राहणार नाही.

वेगवेगळे ठेवा सर्वांचे ब्रश

ही चूक जवळपास प्रत्येक घरात केली जाते. पूर्ण परिवाराचे ब्रश एकाच ठिकाणी एकत्र ठेवले जातात. डॉक्टरांनुसार, असे केल्याने एका टूथब्रशमधील बॅक्टेरिया दुसऱ्या टूथब्रशमध्ये सहजपणे शिरतात. त्यामुळे सर्व ब्रश एकत्र ठेवू नका. 

टूथब्रशची स्वच्छता

अमेरिकन डेंटल असोसिएशननुसार, दर तीन महिन्यांनी ब्रश बदलायला हवा. तसेच ब्रशच्या स्वच्छतेचीही काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. ब्रशचे दाते पसरले असेल तर ब्रश बदला. जर तुम्ही एखाद्या गंभीर आजारातून नुकतेच बाहेर आले असाल तर ब्रश नक्की बदला.

या गोष्टींची घ्या काळजी

- ब्रश हवेमध्ये सुकायला ठेवा, याने फंगस होणार नाही.

- ब्रशमधील घाण स्वच्छ करण्यासाठी ब्रश उकळत्या पाण्यात ५ मिनिटांसाठी ठेवा.

- टूथब्रशचं डोकं एका ग्लासमध्ये ठेवून त्यावर थोडा बेकिंग सोडा आणि पाणी टाकून थोडावेळ भिजवा.

- दात फार ताकद लावून घासत बसू नका. याने हिरड्यांना इजा होऊ शकते.

- ब्रश केल्यानंतर बोटांनी हिरड्यांची हळूहळू मसाज करा. याने हिरड्या मजबूत होतील. 
 

Web Title: Health Tips : Do not keep all toothbrushes together know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.