Paracetamol: पॅरासिटामोलबाबत अजिबात करू नका 'ही' चूक, होऊ शकतं मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 01:21 PM2022-05-17T13:21:26+5:302022-05-17T13:24:47+5:30
Paracetamol Side Effects: डॉक्टरांनुसार, पॅरासिटामोल ताप, अंगदुखी कमी करण्यासाठी फायदेशीर आहेच, पण याचा डबल डोज चुकूनही घेऊ नये. याने किडनी आणि लिव्हर खराब होण्याचा धोका असतो.
Paracetamol Side Effects: तुम्ही तुमच्या मोठ्यांकडून हे अनेकदा ऐकलं असेल की, कोणत्याही गोष्टीची अति चांगली नसते. कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त केली तर त्याने नुकसानच होतं. हीच बाब औषधांबाबतही फिट बसते. जे आपल्या आजारांतून बरे करतात. सामान्यपणे पॅरासिटामोल भारतात असं औषध आहे जे लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायही ताप आला तर घेतात. पण अशात सावधगिरी बाळगणं फार महत्वाचं आहे. तुम्ही जर याचं जास्त प्रमाण घेतलं तर याने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे नुकसान होणार. डॉक्टरांनुसार, पॅरासिटामोल ताप, अंगदुखी कमी करण्यासाठी फायदेशीर आहेच, पण याचा डबल डोज चुकूनही घेऊ नये. याने किडनी आणि लिव्हर खराब होण्याचा धोका असतो.
पॅरासिटामोल किती सुरक्षित?
ताप आणि वेदनेच्या उपचारासाठी पॅरासिटामोल एक फेमस, सामान्य आणि स्वस्त उपाय आहे. पण याच्या डोजबाबत सावध राहण्याची फार गरज आहे. तज्ज्ञांनुसार, वयस्कांनी ५०० एमजी पॅरासिटामोलची एक किंवा दोन गोळ्या दिवसातून चार वेळा दिली जाऊ शकते. पण यापेक्षा जास्त डोज घेतला तर याने शरीराला नुकसान पोहोचतं. इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसचं म्हणणं आहे की, वर सांगितलेल्या डोजपेक्षा जास्त पॅरासिटामोलचं सेवन केल्याने किडनी आणि लिव्हर खराब होऊ शकतं. काही केसेसमध्ये परिणाम यापेक्षाही वाईट होऊ शकतात.
सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये एक रिसर्च प्रकाशित झाला आहे. या रिसर्चमध्ये मनुष्याच्या आणि उंदरांच्या लिव्हरच्या कोशिकांवर पॅरासिटामोलच्या प्रभावाचं मूल्यांकन करण्यात आलं होतं. यातून समोर आलं की, वेदना दूर होण्याचा लिव्हरवर प्रतिकूल प्रभाव पडू शकतो. कारण याने अवयवात असलेल्या कोशिकांमध्ये संरचनात्मक कनेक्शनला नुकसान पोहोचवतं. याचाच परिणाम असा होतो की, लिव्हरची उतक संरचना क्षतिग्रस्त होते. कोशिका योग्यप्रकारे काम करण्याची क्षमता गमावतात. यात व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.
पॅरासिटामोलचा डोज जास्त प्रमाणात घेतल्याने होणारं नुकसान तसंच असतं जसं हेपेटायटीस, कॅन्सर आणि सिरोसिसच्या रूग्णांचं होतं. तज्ज्ञ सांगतात की, जर याचा योग्य डोज घेतला तर याच्या दुष्परिणामांचा धोका राहत नाही. तरीही याच्या नुकसानाने तुम्ही चिंतेत असाल तर पॅरासिटामोल घेण्याआधी डॉक्टरांना संपर्क करा.