जेवताना जास्तीत जास्त लोक करतात ही चूक, वेळीच व्हा सावध नाही तर पडू शकते महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 05:04 PM2023-02-27T17:04:02+5:302023-02-27T17:10:54+5:30
Health Tips : सामान्यपणे सकाळी शाळा-कॉलेज किंवा ऑफिसला जाताना उशीर होऊ नये म्हणून लोक जेवणाला योग्य वेळ देऊ शकत नाहीत आणि घाईघाईत ब्रेकफास्ट किंवा जेवण संपवतात.
Health Tips : जेवण करणं ही आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाच्या क्रियांपैकी एक आहे. वेगवेगळ्या देशात जेवणाची वेगवेगळी पद्धत असते. काही लोक लग्नात उभं राहून जेवतात तर काही लोक घरी किंवा हॉटेलमध्ये डेबलवर बसून जेवतात. अनेक ठिकाणी मांडी घालून खाली बसून जेवण्याची पद्धत फार कमी होत चालली आहे. पण असं करणं आरोग्यासाठी फार घातक ठरू शकते. एका सर्व्हेनुसार, उभं राहून जेवणं करणं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. ते कसं हे जाणून घेऊ.
सामान्यपणे सकाळी शाळा-कॉलेज किंवा ऑफिसला जाताना उशीर होऊ नये म्हणून लोक जेवणाला योग्य वेळ देऊ शकत नाहीत आणि घाईघाईत ब्रेकफास्ट किंवा जेवण संपवतात. रिसर्चनुसार, जर एखादी व्यक्ती उभं राहून जेवण करत असेल तर त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्याच्या शरीरातील काही ग्रंथी काम करणं बंद करतात आणि ती व्यक्ती सतत तणावात राहू शकते. जेव्हा आपण उभे राहून जेवण करतो तेव्हा अन्न पचायला वेळ जास्त लागतो आणि घाईघाईत आपण जास्त जेवण करतो.
उभं राहून किंवा चालता-फिरता खाऊ नका
नेहमीच बघितलं असेल की, लग्नात किंवा एखाद्या कार्यक्रमात लोक उभे राहूनच जेवण करतात. तुम्हीही असंच करत असाल तर वेळीच सावध व्हा. मुळात उभं राहून जेवण करताना तुम्हाला भूकेचा अंदाज लागत नाही आणि अशात तुम्ही जास्त खाता. असं केल्याने तुमचं वजन वाढू लागतं.
खाली बसून जेवण्याचे फायदे
खाली बसून जेवण करण्याचे अनेक फायदे आहेत. एकतर बॉडी पोश्चर सधारतो. खाली बसून जेवण केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुद्धा चांगला राहतो. क्रॉस-लेग्स म्हणजे मांडी घालून बसल्याने नसांमधील तणाव दूर होतो. त्यामुळे रोज खाली बसून जेवण केलं तर तुम्हाला फायदाच होईल. सोबतच खाली बसून जेवणं पाठीसाठी चांगलं आहे.
उभं राहून जेवण केल्याने शरीराचं पॉश्चर बिघडतं. जेव्हा आपणं उभे राहून जेवण करतो तेव्हा फार जास्त वाकतो, तसेच स्वत:ला रिलॅक्स करण्यासाठी शरीराच्या कोणत्याही एका भागावर जास्त जोर देतो. जर रोजच आपण असं केलं तर याचा प्रभाव पाठीच्या कण्यावर पडू शकतो.
पचनक्रिया बिघडते
घाईघाईने जेवण केल्याने पचनक्रिया खराब होऊ शकते. ज्यामुळे तुमच्या शरीरात फॅट वाढू लागतं आणि तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होऊ लागता. त्यामुळे खाली बसून मांडी घालून जेवण कराल तर तुमचा फायदा आहे. बसून जेवल्याने पोट लवकर भरतं. अशात वजन कंट्रोल करण्याच्या उद्देशाने असं करणं फायदेशीर आहे. त्यामुळे वेळीच तुमच्या सवयी बदला.
गॅस होतो
पोटात अनेक कारणांमुळे गॅस तयार होतो. त्यातील एक कारण असतं घाईघाईने जेवण करणे. अशा स्थितीत अन्न पचवणं अवघड होतं. त्यामुळे पोटात जडपणा, गॅस अशा समस्या जाणवू लागतात. त्यामुळे जेवण नेहमी हळू आणि बसून करावं.
कंझूमर रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यात सांगण्यात आले आहे की, आपलं वेस्टिबुलर सेंस कशाप्रकारे सेंसरी सिस्टमवर प्रभाव टाकतं. अमेरिकेतील साउथ फ्लोरिडा यूनिव्हर्सिटीचे प्रोफेसर दीपायन विश्वास यांच्या नेतत्वात करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आले की, गुरूत्वाकर्षण शरीराच्या खालच्या भागात रक्त वेगाने खेचतं, ज्यामुळे हृदयाला रक्त पुन्हा वर खेचण्यासाठी जास्त वेगाने काम करावं लागतं आणि तेव्हा हृदयाची गती वाढते.