Tea: चहा प्यायल्याने वजन वाढतं का? जाणून घ्या यातील सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 05:13 PM2022-06-28T17:13:28+5:302022-06-28T17:13:40+5:30
Does Drinking Tea Cause Weight Gain : फिट रहायचं असेल तर तुम्हाला चहापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण दुधाचा चहा प्यायल्याने वजन वाढतं. पण हे खरंच सत्य आहे का? चला जाणून घेऊ यातील सत्य...
Does Drinking Tea Cause Weight Gain : चहा जास्तीत जास्त लोकांच्या आवडत्या मॉर्निंग ड्रिंक्सपैकी एक आहे. आपल्यापैकी जास्तीत जास्त लोक त्यांच्या दिवसाची सुरूवात एक कप चहाने करतात. याने तुम्ही फ्रेश वाटतं. तेच काही लोक तर दिवसातून 4 ते 5 कप किंवा त्यापेक्षा जास्त चहा पितात. पण फिट रहायचं असेल तर तुम्हाला चहापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण दुधाचा चहा प्यायल्याने वजन वाढतं. पण हे खरंच सत्य आहे का? चला जाणून घेऊ यातील सत्य...
चहा प्यायल्याने वजन वाढतं?
चहा पिऊन वजन वाढणं हे चहाच्या सामग्रीवर अवलंबून असतं. चहा बनवण्यासाठी दूध आणि साखरेचा वापर केला जातो. कारण त्याशिवाय चहा अपुरा आहे. पण दूध आणि साखर या दोन्ही गोष्टी वजन वाढण्यास कारणीभूत असतात. तेच जर तुम्ही जास्त फॅट असलेल्या दुधाचा चहा पित असले तर शरीरात चरबी आणि वजन वाढतं. जर तुम्ही सामान्य दुधाच्या चहात अर्धा चमचा साखर टाकून रोज पित असाल तर याने तुमचं वर्षाला एक किलो वजन वाढू शकतं. तेच जर तुम्ही रोज 2 ते 3 कप चहा पित असाल तरीही तुमचं वजन वाढतं.
साखरेचं प्रमाण कमी करा
चहात गोडवा नसेल तर चहा अनेकांना आवडत नाही. पण तुमच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे की, तुम्ही चहात साखरेचा वापर करू नये किंवा कमी करावा. सोबतच चहामध्ये आर्टिफिशिअलचा वापर करत असाल तर कमी करा. त्याऐवजी तुम्ही चहात गुळ आणि मधाचा वापर करू शकता.
फॅट असलेल्या दुधाचा वापर कमी
जर तुम्ही चहाचे शौकीन असाल आणि चहा सोडू शकत नसाल तर तुम्ही चहामध्ये लो फॅट दुधाचा वापर करा. मिल्क पावडर तर अजिबात वापरू नका. तुम्ही काळा सुद्धा घेऊ शकता. तो आरोग्यासाठीही चांगला असतो.