Health Tips: बरेच लोक जेवण केल्यावर करतात 'या' चुका, ज्यामुळे होतात अनेक समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 10:04 AM2023-12-21T10:04:02+5:302023-12-21T10:06:27+5:30

Health Tips : अनेकदा तर लोक जेवण केल्यावर अशा काही छोट्या छोट्या चुका करतात ज्यामुळे त्यांना अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो.

Health Tips : Don't do these 5 things immediately after eating food | Health Tips: बरेच लोक जेवण केल्यावर करतात 'या' चुका, ज्यामुळे होतात अनेक समस्या

Health Tips: बरेच लोक जेवण केल्यावर करतात 'या' चुका, ज्यामुळे होतात अनेक समस्या

Health Tips : आजकाल लोक या धावपळीच्या जीवनात आपल्या आरोग्याची काळजी घेणं विसरून जातात. चुकीची लाइफस्टाईल आणि खाणं-पिणं यामुळे शरीरात वेगवेगळे आजार घर करतात. अनेकदा तर लोक जेवण केल्यावर अशा काही छोट्या छोट्या चुका करतात ज्यामुळे त्यांना अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो.

चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्यामुळे शरीराला फार नुकसान होतं. काही अशा गोष्टी असतात ज्या जेवण केल्यावर लगेच करणं महागात पडू शकतं. चला जाणून घेऊ जेवण केल्यावर लगेच काय करू नये.

लगेच चहा

बऱ्याच लोकांना जेवण केल्यावर लगेच पिण्याची सवय असते. पण असं केलं तर अन्न पचन होण्यास समस्या होते. जर तुम्हाला चहा प्यायचाच असेल तर जेवण केल्यावर 1 ते 2 तासांनंतर प्यावा.

लगेच झोपणे

जेवण केल्यावर बरेच लगेच बेडवर किंवा सोफ्यावर जाऊन झोपतात. अशी चूक तुम्ही कधीच करायला नको. याने पोटाचं फार नुकसान होतं आणि गॅससारखी समस्या होते. तसेच अन्न पचनही होत नाही.

लगेच फिरणं

जेवण केल्यावर थोडावेळ पायी चालण्याचे अनेक फायदे होतात. पण जेवण केल्यावर लगेच पायी चालणं नुकसानकारक ठरू शकतं. फार जास्त वेळ चालणंही चुकीचं आहे. जेवण केल्यावर लगेच चालल्याने ब्‍लड सर्कुलेशन कमी होतं.

आंघोळ करणं

जेवण केल्यावर लगेच आंघोळही करू नये. याने शरीराला नुकसान होतं. असं केल्याने डायजेशन बरोबर होत नाही आणि ब्लड प्रेशरही वाढतं.

Web Title: Health Tips : Don't do these 5 things immediately after eating food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.