'या' अवयवांवरील केस उपटणं पडू शकतं महागात, कधीच करू नका ही चूक!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 05:00 PM2023-07-22T17:00:52+5:302023-07-22T17:01:52+5:30
Health Tips : अशाप्रकारे केस उपटून काढणे तुम्हाला महागात पडू शकतं. कसं ते खालीलप्रमाणे TheHealthSite ने दिलेल्या वृत्तानुसार सांगता येईल.
Health Tips : महिला असो वा पुरूष सगळ्यांच्याच शरीरांवर वेगवेगळ्या ठिकाणी केस येतात. मात्र, महिला आणि पुरूष यांच्यात काही हार्मोन्सच्या वेगळेपणामुळे महिलांना मिशी किंवा दाढी येत नाही. पण तरी सुद्धा काही शरीराच्या काही भागांवर अनावश्यक केस येतात. याने होतं असं की, सौंदर्याचे तीनतेरा वाजतात. अशात हे केस उपटून काढण्याचा प्रयत्न काही लोक करतात. पण अशाप्रकारे केस उपटून काढणे तुम्हाला महागात पडू शकतं. कसं ते खालीलप्रमाणे TheHealthSite ने दिलेल्या वृत्तानुसार सांगता येईल.
1) चामखीळ
अनेकदा शरीरावरील चामखिळीवरही एक किंवा दोन केस येतात. पण त्यावरील केस खेचून काढू नये. असं कराल तर तीव्र वेदना होतात सोबतच इन्फेक्शनचाही धोका असतो. तुम्हाला चामखिळीवरील केस काढायचा असेलच तर ट्रीम करा किंवा लेझर हेअर रिड क्शनच्या मदतीने योग्य आणि सुरक्षित पद्धतीने काढा.
2) स्तनांजवळचे
स्तनांजवळ विरळ स्वरूपात केस असणं सामान्य बाब आहे. ते उपटण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे तीव्र वेदना होऊ शकतात. तर ट्विझरने केस उपटल्याने इन्फेक्शन होऊ शकते. विनाकारण २ मिलीमीटरपेक्षा लहान केस उपटू नका. अगदीच गरज असेल तर स्तनाजवळील केसांना उपटण्याऐवजी ट्रीम करा.
3) भुवया
कपाळावरील आयब्रो हा देखील एक नाजूक भाग आहे. सतत त्या जागेवरील केस उपटल्याने हेअर फॉलिकल्सला त्रास होऊ शकतो. ब्युटी पार्लरमध्ये तज्ञांद्वारा भुवयांना शेप देणं सुरक्षित आहे. परंतू स्वतःहून भुवयांजवळील केस उपटू नका.