दुधात तूप टाकून प्यायले तर होतात हे जबरदस्त फायदे, फार जुना आहे आयुर्वेदिक उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 13:16 IST2022-09-07T13:14:23+5:302022-09-07T13:16:14+5:30
Milk with Ghee Benefits: कारण तूपात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के प्रोटीन व अॅंटीऑक्सिडेंटसारखे पोषक तत्व असतात. तर दुधामध्ये व्हिटॅमिन डी, प्रोटीन, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. दुधात तूप टाकून पिणं हा अनेक वर्षांपासूनचा आयुर्वेदिक उपाय आहे.

दुधात तूप टाकून प्यायले तर होतात हे जबरदस्त फायदे, फार जुना आहे आयुर्वेदिक उपाय
Milk with Ghee Benefits: दूध आणि तूपाचं एकत्र सेवन केलं तर आरोग्याला अनेक फायदे होतात. दूध आणि तूप अनेक पोषक तत्वांनी भरलेलं असतं. पण जेव्हा दूध आणि तुपाचं एकत्र सेवन केलं गेलं तर याचे फायदे दुप्पट होतात. याचं कारण तूपात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के प्रोटीन व अॅंटीऑक्सिडेंटसारखे पोषक तत्व असतात. तर दुधामध्ये व्हिटॅमिन डी, प्रोटीन, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं. दुधात तूप टाकून पिणं हा अनेक वर्षांपासूनचा आयुर्वेदिक उपाय आहे.
डायजेशन सिस्टीम
दूध आणि तूपाचं एकत्र सेवन केलं तर शरीरातील पचन एंजाइम्सला उत्तेजित करून पचनशक्ती वाढवतं. हे एंजाइम कठिण पदार्थांना तोडतात, ज्यामुळे पचनक्रिया अवघड न होता सोपी होते.
चांगल्या झोपेसाठी
तूपामुळे तणाव कमी होऊन मूड रिफ्रेश होतो. जेव्हा एक दुधात तूप मिक्स करून प्याल तर याने शरीरातील सर्व नसा शांत होतात. ज्यामुळे चांगली झोप लागते.
सांधेदुखी
जर तुम्हाला सांधेधुखीची समस्या असेल तर नियमितपणे दुधात तूप टाकून प्यायला हवं. दुधात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं आणि तूपात व्हिटॅमिन के2 चं प्रमाण भरपूर असतं. हे व्हिटॅमिन्स हाडांसाठी फायदेशीर असतात. जर तुम्ही दुधात तूप टाकून प्यायलात तर तुम्हाला हाडांची आणि सांधेदुखीची समस्या कधीच होणार नाही.
त्वचेवर ग्लो
तूप आणि दूध दोन्हीही नॅच्युरल मॉइश्चरायजर असतात. त्याशिवाय तूपाने त्वचा आतून आणि बाहेरून चांगली होते. त्यामुळे जर तुम्ही प्रत्येक रात्री तूप आणि दुधाचं एकत्र सेवन कराल तर त्वचेवरील ग्लो वाढेल.
मेटाबॉलिज्म
रात्री झोपताना दुधात तूप मिक्स करून प्यायलात तर मेटाबॉलिज्म चांगलं होतं. याने तुम्हाला शरीराचं वजन कमी करण्यास मदत मिळते. त्याशिवाय दूध आणि तूप एकत्र प्यायल्याने बद्धकोष्ठताही दूर होते आणि इम्यूनिटीही वाढते.