रात्री झोपण्याआधी पाणी प्यावं की नाही? डायटिशिअनने सांगितलं सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 12:57 PM2023-03-13T12:57:01+5:302023-03-13T12:57:52+5:30

Tips To Drink Water At Night: एक्सपर्टनुसार, रात्री झोपण्याआधी पाणी सावधनतेने प्यायलं पाहिजे. चूक केली तर शरीराच्या काही भागात सूज येण्याची समस्या होऊ शकते.

Health Tips : Drinking water before bedtime not good for health | रात्री झोपण्याआधी पाणी प्यावं की नाही? डायटिशिअनने सांगितलं सत्य...

रात्री झोपण्याआधी पाणी प्यावं की नाही? डायटिशिअनने सांगितलं सत्य...

googlenewsNext

Tips To Drink Water At Night: चांगल्या आरोग्यासाठी पाणी फाय गरजेचं असतं. शरीरात पाण्याचं योग्य प्रमाण असणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पाणी कमी झालं तर अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. याच कारणाने डॉक्टर-डायटिशिअन रोज भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. काही लोक असेही असतात. जे रात्री झोपण्याआधी भरपूर पाणी पितात आणि त्यांना वाटतं की, याने त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही. एक्सपर्टनुसार, रात्री झोपण्याआधी पाणी सावधनतेने प्यायलं पाहिजे. चूक केली तर शरीराच्या काही भागात सूज येण्याची समस्या होऊ शकते.

डायटिशियन कामिनी सिन्हा यांच्यानुसार, रात्री झोपण्याआधी लगेच पाणी पिणं फायदेशीर नसतं. सामान्यपणे लोकांना झोपण्याच्या साधारण 1 तासआधी पाणी प्यायला हवं. झोपण्याआधी दूध पिणं फायदेशीर असतं. दूध प्यायल्याने तुम्हाला प्रोटीन मिळतं, जे झोपताना तुमच्या शरीराला फायदे देतं. जर तहान लागली तर पाणी पिऊ शकता. पण विनाकारण तहान न लागता जबरदस्ती पाणी पिणं टाळलं पाहिजे. जास्त पाणी पिऊन झोपल्याने चेहरा-हात-पायांवर सूज येण्याची समस्या होते. याला वॉटर रिटेंशन किंवा एडिमा म्हटलं जातं.

कॉन्स्टिपेशनच्या रूग्णांनी असं करा....

डायटिशियन कामिनी म्हणाल्या की, कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेची समस्या असणाऱ्यांनी झोपण्याआधी थोडं पाणी प्यावं. तसेच त्यांनी सकाळी झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटी खूप पाणी प्यावं. याने त्यांची समस्या दूर होईल आणि डायजेशन सिस्टीमही चांगली होईल. महत्वाचं म्हणजे लोकांनी दररोज कमीत कमी 2 ते 3 लीटर पाणी नक्की प्यावं. जेणेकरून शरीर हाइड्रेटेड रहावं आणि डिहाइड्रेशनची समस्या होई नये. पाणी शरीरासाठी फार महत्वाचं असतं आणि उन्हाळ्यात पाणी आणखी जास्त गरजेचं असतं. किडनी स्टोनच्या रूग्णांसाठी पाणी अधिक फायदेशीर ठरतं.

रात्री दूध पिणं फायदेशीर

एक्सपर्टनुसार, रात्री झोपण्याआधी दूध पिणं फायदेशीर मानलं जातं. याने डायजेशन सिस्टीम चांगली राहते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असलेल्या लोकांनी एक ग्लास कोमट दूध प्यावं. याने थकवा दूर होतो आणि चांगली झोप येते. आयुर्वेदात सांगितलं आहे की, रात्री दूध पिणं सगळ्यात जास्त फायदेशीर असतं.

Web Title: Health Tips : Drinking water before bedtime not good for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.