सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 11:40 AM2024-07-23T11:40:14+5:302024-07-23T11:41:09+5:30
Water Drinking Empty Stomach : सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे काय फायदे असतात हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Water Drinking Empty Stomach : पाणी आपल्या शरीरासाठी किती महत्वाचं आहे हे सगळ्यांना माहीत आहे. पण पाणी कधी आणि किती प्यावं हे जर तुम्हाला समजलं तर तुमचं आरोग्य कधीच बिघडणार नाही. अनेक एक्सपर्ट रोज सकाळी रिकाम्या पोटी पिण्याचा सल्ला देतात. त्यामागे काहीतरी कारण असतं. सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे काय फायदे असतात हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आपलं शरीर निरोगी आणि फिट ठेवण्यात पाणी महत्वाची भूमिका बजावतं. मानवी शरीरात पाण्याचं प्रमाण 60-70 टक्के असतं. पाणी हे कोशिकांच्या माध्यामातून पोषक तत्व आणि ऑक्सीजन पोहोचवतं. यासोबतच पाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. सकाळी उठून रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास त्याचेही अनेक फायदे होते.
सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे
1) जेव्हा सकाळी आपण उठतो तेव्हा आपल्या शरीराला पाण्याची अत्याधिक गरज असते. त्यामुळे सकाळी उठल्यावर 2 ते 3 ग्लास पाणी प्यायला हवं.
2) सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात. यामुळे रक्त स्वच्छ होतं. रक्त स्वच्छ झाल्याने त्वचेवर चमक येते.
3) शरीराची स्वत:ची एक सुरक्षा यंत्रणा असते जी इन्फेक्शन आणि खराब कोशिकांशी लढण्यात मदत करतात. सकाळी पाणी प्यायल्याने इन्फेक्शनसोबत लढण्याची क्षमता वाढते.
4) जपानी मेडिकल सोसायटीनुसार, रिकाम्या पोटी सकाळी पाणी प्यायल्याने तुम्हाला डोके दुखी, अंगदुखी, हृदयाचे आजार, वाढतं वजन, अस्थमा, टीबी, किडनी आणि लघवीच्या आजारांचा उपचार घेण्यास मदत मिळते.
5) सकाळी पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म सक्रिय होतो. त्यामुळे वजन कमी करण्यातही तुम्हाला मदत मिळते.
6) सकाळी उठून पाणी प्यायल्याने नवीन कोशिकांची निर्मिती होते. यासोबतच मांसपेशींमध्ये मजबूती येते.
7) सकाळी उठून पाणी प्यायल्याने गळा, मासिक पाळी, डोळे, लघवी आणि किडनीसंबंधी समस्या दूर होतात.