कोणत्या सवयी बदलल्या तर कमी होईल हार्ट डिजीज आणि डायबिटीसचा धोका, वाचा आणि लगेच बदला!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 01:35 PM2023-08-16T13:35:58+5:302023-08-16T13:36:47+5:30
Health Tips : अशा अनेक सवयी आहेत ज्यामुळे तुम्ही कमी वयात हृदयरोग आणि डायबिटीससारख्या गंभीर आजारांचे शिकार होतात.
Health Tips : डॉक्टर नेहमीच सांगतात की, आपल्या सवयी आपल्या आजारी करतात. अनेकांना अशा काही सवयी असतात ज्यामुळे ते गंभीर आजारांचे शिकार होतात. पण ते या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. जे नंतर त्यांना महागात पडतं. अशा अनेक सवयी आहेत ज्यामुळे तुम्ही कमी वयात हृदयरोग आणि डायबिटीससारख्या गंभीर आजारांचे शिकार होतात.
तुम्ही जर रात्री लवकर झोपत असाल तर तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी चांगली आहे. पण जे लोक रात्री उशीरा झोपतात, त्यांनी उशीरा झोपण्याचे नुकसान आणि लवकर झोपण्याच्या फायद्यांबाबत नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. एका रिसर्चनुसार, जे लोक पुरेशी झोप घेत नाहीत किंवा लवकर झोपत नाहीत. अशा लोकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो.
विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता
आपले विचार, आपले वागणे व आपला व्यवहार आणि झोपेचा थेट संबंध असतो. असं मानलं जातं की, जी व्यक्ती पुरेशी झोप घेत नाही आणि लवकर झोपत नाहीत. ते मानसिक रूपाने स्वत:ला फिट ठेवू शकणार नाही आणि त्यांच्या विचार करण्याच्या व समजून घेण्याच्या क्षमतेवर वाईट प्रभाव पडेल. चांगली झोप वास्तवात तुमची विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता वाढवू शकते आणि याने तुमचा मेंदू स्थिर राहतो.
ऑफिसचं काम चांगलं होईल
तुम्ही लवकर झोपत असाल आणि पुरेशी झोप घेत असाल तर याने तुमची प्रोडक्टिविटीही वाढते. याने केवळ तुमची एकाग्रताच वाढत नाही तर तुमची स्मरणशक्तीही वाढते. तुम्हाला थकवा सुद्घा जाणवणार नाही. याने तुमची कार्यक्षमता वाढेल.
वजन राहील नियंत्रणात
तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा नियंत्रित ठेवायचं असेल तर पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. अनेक शोधांमधून हे समोर आलं आहे की, जी व्यक्ती रात्री उशीरा झोपते किंवा पुरेशी झोप घेत नाहीत त्यांचं वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लवकर झोपा आणि लवकर उठा.
फिट आणि हेल्दी रहा
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी रोज लवकर झोपायला पाहिजे आणि पुरशी झोप घ्यायला पाहिजे. पुरेशी झोप घेतल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती व्हायरस आणि बॅक्टेरियासोबत चांगल्याप्रकारे लढू शकते. तसेच झोप पूर्ण झाल्यावर रक्तात कोर्टिसोल हार्मोनचं प्रमाणही कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्तीची प्रक्रिया चांगली होते.
क्रॉनिक डिजीज
पुरेशी झोप घेणे आणि लवकर झोपण्याने अनेकप्रकारच्या क्रॉनिक डिजीजचा धोका कमी केला जाऊ शकतो आणि जास्त आयुष्य जगता येऊ शकतं. काही शोधांमधून समोर आलं आहे की, जे लोक सहा तासांपेक्षा कमी झोप घेतात, त्यांना टाइप २ डायबिटीस, हृदयरोग आणि उच्च रक्तदाबचा धोका अधिक असतो.