दातांचा पिवळटपणा आणि काळे डाग कसे साफ कराल? डेंटिस्ट्सनी सांगितले चमकदार दातांचे उपाय

By Manali.bagul | Published: November 26, 2020 05:14 PM2020-11-26T17:14:08+5:302020-11-26T17:28:21+5:30

Health Tips in Marathi: साधारणपणे जे लोक पान, गुटखा, तंबाखू खातात किंवा चहा जास्त पितात त्यांच्या दातांवर काळे, पिवळे डाग पडतात. वैद्यकिय परिभाषेत या पिवळ्या डागांना प्लाक म्हणतात. काळ्या डागांना टार्टर म्हणतात.

Health tips : Easy home remedies to clean plaque and tartar to get healthy white teeth | दातांचा पिवळटपणा आणि काळे डाग कसे साफ कराल? डेंटिस्ट्सनी सांगितले चमकदार दातांचे उपाय

दातांचा पिवळटपणा आणि काळे डाग कसे साफ कराल? डेंटिस्ट्सनी सांगितले चमकदार दातांचे उपाय

googlenewsNext

आपण रोजचं सकाळी दात स्वच्छ करतो. अनेकजण रात्री झोपतानाही दात स्वच्छ करून मगच झोपतात. तरिसुद्धा अनेकांच्या दातांवर नेहमी काळे, पिवळे डाग दिसून येतात. साधारणपणे जे लोक पान, गुटखा, तंबाखू खातात किंवा चहा जास्त पितात त्यांच्या दातांवर काळे, पिवळे डाग पडतात. वैद्यकिय परिभाषेत या पिवळ्या डागांना प्लाक म्हणतात. काळ्या डागांना  टार्टर म्हणतात. ओन्ली माय हेल्थशी बोतलाना डेंटल क्लीनिकचे डॉ. विकास यांनी दातांच्या पिवळेपणाचे कारण आणि काळे डाग  दूर करण्याचे उपाय सांगितले आहेत. 

प्लाक आणि टार्टर म्हणजे काय? 

प्लाकमुळे दात पिवळे दिसून येतात. प्लाक एक चिकट पदार्थ आहे. ज्यामुळे दातांवर एक थर तयार होतो.   तोंडात असलेल्या  बॅक्टेरियांमुळे प्लाक वाढत जातात.  जेव्हा तुम्ही घास चावून खाता तेव्हा अन्न लाळेसोबत मिक्स होते. त्यानंतर बॅक्टेरियांद्वारे अन्नपचनाचे काम केले जाते.  त्यामुळे दातांच्यामध्ये अन्नकण अडकल्याने प्लाक तयार होतात. जे लोक रोज दोन ते तीन वेळा दात स्वच्छता करतात त्यांच्या दातांवर प्लाक जमा होत नाही. जे लोक नियमित, व्यवस्थित दात घासत नाही त्यांचे दात प्लाकमुळे खराब होतात. 

जेव्हा दीर्घकाळ  दातांमध्ये प्लाक जमा होतं तेव्हा त्याचा रंग  जास्त पिवळा किंवा काळा होत जातो.  त्याला टार्टर असं म्हणतात.  ज्या व्यक्तीच्या दातांमध्ये पिळवे डाग दिसून येतात तेव्हा दातांमध्ये प्लाक जमा झालेले असतात. त्यामुळे हिरड्यांना  नुकसान पोहोचते. सतत हिरड्यांवर परिणाम झाल्याने गंभीर आजारांचा धोका उद्भवतो. प्लाक आणि टार्टरमुळे श्वासांना दुर्गंधी येण्याची समस्या उद्भवते. कॅविटीज येणं, तोंडातून दुर्गंधी येणं, हिरड्या खराब होणं,पेरिओडोन्टल समस्या, जिंजीवाटीस म्हणजेच हिरड्यांना सूज येणं अशा समस्या उद्भवतात.

दात स्वच्छ करण्यासाठी ब्रश करणे हा पहिला उपचार आहे. ज्यामुळे दातांमधील प्लाक आणि टार्टरची समस्या दूर होऊ शकते. खाल्ल्यानंतर जर व्यक्ती व्यवस्थित ब्रश करते तर दातामध्ये प्लेग किंवा टार्टार जमा होण्याची शक्यता बर्‍याच प्रमाणात कमी होते. दात स्वच्छ ठेवण्यासाठी  व्यक्तीने कमीतकमी 3 मिनिटे 2 वेळा ब्रश करावा.

स्केलिंग

दात स्केलिंग ही एक पद्धत आहे जी एखाद्या व्यक्तीचे दात निरोगी आणि मजबूत ठेवण्यास मदत करते. स्केलिंगमुळे प्लाक, टार्टर आणि दातवरील इतर डाग निघू शकतात.  स्केलिंग थोडी महाग आहे परंतु जर दातांवर साचलेली घाण स्केलिंगद्वारे काढली गेली नाही तर दात खराब होऊ शकतात. ज्या लोकांच्या दातात जास्त प्लाक आहेत किंवा टार्टरमुळे काळे झाले आहेत, त्यांनी डॉक्टरकडे जावे आणि ते स्वच्छ करून घ्यावे.

घरगुती उपाय

दातांवरील प्लाकचा प्रभाव कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील अवलंबू शकता. परंतु हे लक्षात ठेवा की या टिप्स दातांचा पिवळटपणा कमी प्रमाणात दूर करू शकतात. तीव्रतेच्या टार्टारच्या समस्येच्या बाबतीत वैद्यकीय मदत घेणे हा योग्य तोडगा आहे.

चिंताजनक! ९४ टक्के यशस्वी लसीनेही कोरोनाचा प्रसार थांबणार नाही, मॉर्डनाच्या तज्ज्ञांचा दावा

ग्लिसरीन आणि कोरफड मिसळून घ्या. त्यात लिंबाचे काही थेंब घाला, दातांवर घासा आणि 10 मिनिटानंतर स्वच्छ धुवा. दररोज हा उपाय केल्यास दातांची समस्या दूर होऊ शकते. 2 चमचे व्हिनेगर आणि पाण्याने  गुळण्या करा. असे केल्याने दात निरोगी राहतात.

एल्कोहोल, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेटबंद फूड, सोडा, चहा आणि कॉफी यामुळे दात खराब होतात. त्यासाठी अशा एसिडिक पदार्थांचे सेवन केल्यानंतर दात स्वच्छ करा. 

दुर्गंधी  घालवण्यासाठी बडीशेप, लवंग, तुळशी किंवा पुदिन्याची पाने चावून खा. मिंट किंवा इतर सुवासिक पण शुगरफ्री च्युईंग गम चावल्याने दुर्गंधी कमी होते.  रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर दात घासायला हवेत. सॉफ्ट ब्रशचा वापर दात घासण्याासाठी करावा. 

घरात राहूनही होऊ शकते धुळीच्या एलर्जीची समस्या; तज्ज्ञांनी सांगितली लक्षणं अन् बचावाचे उपाय 

सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे तुम्हाला जर तुमचे दात चांगले ठेवायचे असतील तर आठवड्यातून एकदा गरम पाण्यात पेरूची पान उकळून घ्या. नंतर हे पाणी थंड करून पाण्याच्या गुळण्या करा. यामुळे तुमचे दात दीर्घकाळपर्यंत मजबूत राहतील.

Web Title: Health tips : Easy home remedies to clean plaque and tartar to get healthy white teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.