High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशरचा धोका कमी करतो 'हा' एक पदार्थ, रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 11:54 AM2021-12-14T11:54:47+5:302021-12-14T11:55:06+5:30

High Blood pressure : हाय ब्लड प्रेशरमुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणं फार गरजेचं असतं आणि यात आहाराची फार महत्वाची भूमिका असते.

Health Tips : Eat yoghurt daily to manage high blood pressure says study | High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशरचा धोका कमी करतो 'हा' एक पदार्थ, रिसर्चमधून खुलासा

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशरचा धोका कमी करतो 'हा' एक पदार्थ, रिसर्चमधून खुलासा

googlenewsNext

हाय ब्लड प्रेशरची समस्या फारच कॉमन आहे, पण हा आजार सर्वात धोकादायक आजारांपैकी एक आहे. हाय ब्लड प्रेशरमुळे (High Blood pressure) अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणं फार गरजेचं असतं आणि यात आहाराची फार महत्वाची भूमिका असते. एका नव्या रिसर्चनुसार, हाय ब्लड प्रेशर ठीक करण्यासाठी दही (Curd) फार फायदेशीर आहे. साऊथ ऑस्ट्रेलिया यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी केलेला हा रिसर्च इंटरनॅशनल डेअरी जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. 

काय सांगतो रिसर्च?

वैज्ञानिकांनी दह्याचं सेवन, ब्लड प्रेशर आणि हृदयरोग यातील संबंधाचा अभ्यास केला. वैज्ञानिकांना आढळलं की, दह्याने हायपरटेंशन किंवा हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांमध्ये ब्लड प्रेशरचं प्रमाण कमी होतं. जगभरात अब्जो लोक हाय ब्लड प्रेशरच्या समस्येने ग्रस्त आहेत. यामुळे त्यांच्यात हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका नेहमीच असतो. वैज्ञानिक डॉक्टर अलेक्जेंड्रा वेडचं मत आहे की, नव्या रिसर्चमधून या गोष्टीचे पुरावे मिळतात की, हाय ब्लड प्रेशरवाल्यांवर दह्याने एक सकारात्मक परिणाम होतो.

डॉक्टर वेड म्हणाले की, 'हाय ब्लड प्रेशर हृदयरोगाशी संबंधित आहे. त्यामुळे गरजेचं आहे की, हे कमी आणि नियंत्रित ठेवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने शोधाव्या. डेअरी फूड्स, खासकरून दही ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. कारण डेअरी पदार्थांमध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमसहीत अनेके पोषक तत्व असतात, जे ब्लड प्रेशरला नियंत्रित ठेवतात. दह्यात आढळणारे बॅक्टेरिया प्रोटीन वाढवण्याचं काम करतात, ज्याने ब्लड प्रेशर कमी राहतं. रिसर्चमध्ये आढळून आलं की, हाय ब्लड प्रेशरवाल्यांमद्ये दह्याच्या थोड्या प्रमाणानेही ब्लड प्रेशर कमी करण्याचं काम केलं'.

डॉक्टर वेड यांच्यानुसार, जे लोक नियमितपणे दही खातात, त्यांच्यात याचे परिणाम जास्त चांगले बघायला मिळाले. दही न खाणाऱ्यांच्या तुलनेत या लोकांचं ब्लड प्रेशर सात अंकांपर्यंत कमी होतं. वैज्ञानिक म्हणाले की, दह्याचे फायदे बघता भविष्यात आणखी आजारांच्या संदर्भात हा रिसर्च सुरू ठेवला पाहिजे.
 

Web Title: Health Tips : Eat yoghurt daily to manage high blood pressure says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.