Coconut Chutney: खोबऱ्याची चटणी खाण्याचे आरोग्याला होतात हे फायदे, कधी तुम्ही विचारही केला नसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 03:23 PM2022-09-13T15:23:33+5:302022-09-13T15:24:23+5:30

Coconut Chutney Health Benefits: बरेच लोक खोबऱ्याची चटणी आवडीने खातात, पण त्यांना यापासून होणाऱ्या गुपित फायद्यांबाबत अजिबातच काही माहीत नसतं. तेच फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Health Tips : Eating coconut chutney reduces obesity, you should know this | Coconut Chutney: खोबऱ्याची चटणी खाण्याचे आरोग्याला होतात हे फायदे, कधी तुम्ही विचारही केला नसेल

Coconut Chutney: खोबऱ्याची चटणी खाण्याचे आरोग्याला होतात हे फायदे, कधी तुम्ही विचारही केला नसेल

Next

Coconut Chutney Health Benefits: ओल्या खोबऱ्याची चटणी घरात वेगवेगळ्या पदार्थांसोबत आणि जेवणासोबतही खाल्ली जाते. ओल्या खोबऱ्याच्या ताज्या फ्लेवरमुळे चटणीची टेस्ट आणखी जास्त वाढते. नारळात फायबर आणि लॉरिक अ‍ॅसिडचं प्रमाण भरपूर असतं. ज्यामुळे शुगर लेव्हल कंट्रोल होते. बरेच लोक खोबऱ्याची चटणी आवडीने खातात, पण त्यांना यापासून होणाऱ्या गुपित फायद्यांबाबत अजिबातच काही माहीत नसतं. तेच फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

वजन कमी होण्यास मदत मिळते

ओल्या खोबऱ्याच्या चटणीचं नियमितपणे सेवन केलं तर वजन कमी करण्यास मदत मिळते. ही चटणी घरी बनवलेली असेल तर अधिकच फायदेशीर. कारण बाहेरच्या चटणीमध्ये काही नुकसानकारक पदार्थही टाकले जातात. खोबऱ्याच्या चटणीमध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असतं जे वजन कमी करण्यास मदत करतं.

रक्त वाढतं

शरीरात रक्ताची कमतरता असेल किंवा तुम्ही एनीमियाचे शिकार असाल तर तुम्ही खोबऱ्याची चटणी आवर्जून खाल्ली पाहिजे. खोबऱ्याची चटणी नियमितपणे खाल्ल्याने आयर्नची कमतरता दूर होते आणि शरीरात रक्त वाढण्यास मदत मिळते.

इम्यूनिटी वाढते

खोबऱ्याच्या चटणीचं नियमितपणे सेवन केल्याने इम्यूनिटी बूस्ट होते. खोबऱ्याच्या चटणीमध्ये व्हिटॅमिन्स, खनिज भरपूर प्रमाणात असतं. तेच खोबऱ्याची चटणी हार्टच्या रूग्णांसाठीही फायदेशीर मानली जाते. याच्या सेवनाने तुमचं मेटाबॉलिज्मही मजबूत होतं.

बीपी कंट्रोलमध्ये राहतो

ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी खोबऱ्याच्या चटणीचं सेवन फायदेशीर असतं. तेच खोबऱ्याच्या चटणीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुणही आढळतात. ज्यामुळे तुम्ही संक्रमणापासूनही वाचू शकता. 

खोबऱ्याची चटणी तयार करण्याची पद्धत

खोबऱ्याची चटणी तयार करण्यासाठी ओल्या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करा. त्यात थोडी कोथिंबीर, लिंबाचा रस, मीठ, हिरवी मिरची टाकून हे मिश्रण बारीक करा. आता कढईत तेल गरम करून त्याल थोड्या मोहरी टाका. हा तडका खोबऱ्याच्या चटणीमध्ये टाका. अशाप्रकारे तयार आहे तुमची खोबऱ्याची चटणी..
 

Web Title: Health Tips : Eating coconut chutney reduces obesity, you should know this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.