गूळ खाण्याने वाढतं वजन, जाणून घ्या आणखीही नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 11:12 AM2018-08-07T11:12:16+5:302018-08-07T11:14:31+5:30
आयुर्वेदातही अनेकप्रकारच्या रोगांच्या उपचारासाठी गुळाचा वापर सांगितला आहे. खरंतर तुम्ही कोणच्या क्वॉलिटीचा गूळ खाता यावरही त्यांचे परिणाम डिपेन्ड आहेत. चला जाणून घेऊ गुळाचे होणारे नुकसान....
गूळ खाण्याचे जसे अनेक आरोग्यदायी फायदे आहे तसेच त्याचे काही तोटेही आहेत. गूळ एनर्जी वाढवण्यासोबतच मेटाबॉलिज्मही वाढवतो. आयुर्वेदातही अनेकप्रकारच्या रोगांच्या उपचारासाठी गुळाचा वापर सांगितला आहे. खरंतर तुम्ही कोणच्या क्वॉलिटीचा गूळ खाता यावरही त्यांचे परिणाम डिपेन्ड आहेत. चला जाणून घेऊ गुळाचे होणारे नुकसान....
वजन वाढणे
१०० ग्रॅम गुळामध्ये ३८५ कॅलरीज असतात, त्यामुळे जे लोक डाएटवर आहेत त्यांच्यासाठी गूळ अजिबात चांगला नाही. थोड्या प्रमाणात गूळ खाल्यास काही नुकसान होणार नाही, पण प्रमाण जास्त असेल तर वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. गुळामध्ये शुगर आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळे गूळ हा वजन वाढण्यास कारणीभूत ठरु शकतो.
ब्लड शुगर लेव्हल वाढते
तसे तर गुळाला साखरेपेक्षा चांगलं मानलं जातं पण गूळ शेवटी गोड असतोच. जास्त प्रमाणात गूळ खाल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढण्याची भीती असते. १० ग्रॅम गुळामध्ये ९.७ शुगर असते.
इन्फेक्शनची भीती
जर गूळ तयार करताना स्वच्छतेची काळजी घेतली गेली नाही तर त्यात घाण आणि अशुद्धता राहते. तसेच त्यातील किटाणू तुमच्या शरीरात जाऊन तुम्हाला इन्फेक्शनची भीती असते.
अपचनाची समस्या
ताज्या गुळाचे सेवन केल्यास डायरिया होण्याची शक्यता अधिक असते. काही लोकांनी ताजा गूळ खाल्यानंतर त्यांचं पोट दुखण्याची समस्याही सांगितली आहे.
नाकातून रक्त येण्याची समस्या
जर गरमीच्या दिवसांमध्ये गुळाचे जास्त सेवन केले तर नोज ब्लीडिंग म्हणजेच नाकातून रक्त येण्याची समस्या होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात जास्त गूळ खाऊ नये.
इतरही समस्या
गूळ हा साखरेप्रमाणे रिफाइंड होत नाही आणि त्यामुळे यात सुक्रोजचं प्रमाण अधिक असतं. अशात तुम्हाला जर सूज किंवा जळजळ होणे अशी काही समस्या असेल तर गुळाचे सेवन करु नये. एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे की, सुक्रोज, ओमेगा ३ फॅटी अॅसिड कमी करु तुमच्या समस्या अधिक वाढवू शकतं.