...म्हणून हिवाळ्यात वेगाने वजन वाढतं; एक्सपर्ट्सनी सांगितले नेहमी फिट राहण्याचे ७ उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 05:06 PM2020-12-03T17:06:14+5:302020-12-03T17:21:31+5:30

Health Tips in Marathi : आहारात बदल करून किंवा नवीन पदार्थांचा समावेश करून तुम्ही बारिक शरीरयष्टी मिळवू शकता.

Health Tips : Experts say 7 ways to stay fit in winter, easy weight loss tips | ...म्हणून हिवाळ्यात वेगाने वजन वाढतं; एक्सपर्ट्सनी सांगितले नेहमी फिट राहण्याचे ७ उपाय

...म्हणून हिवाळ्यात वेगाने वजन वाढतं; एक्सपर्ट्सनी सांगितले नेहमी फिट राहण्याचे ७ उपाय

googlenewsNext

वजन वाढण्याच्या कारणावरून अनेकांना चिंता वाटत असते. वजन किंवा शरीरावरची जास्तीची चरबी कशी कमी होईल, कोणता व्यायम केल्याने  शरीर बारिक दिसेल असे अनेक प्रश्न लोकांना पडत असतात.  गरमीच्या वातावरणात वजन कमी करणं सोपं असतं. पण थंडीच्या वातावरणात वजन वाढण्याची शक्यता असते. आहारतज्ज्ञ  कामिनी  यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना वाढत्या वजनावर कसं नियंत्रण मिळवायचं याबाबत सांगितले आहे.  आहारात बदल करून किंवा नवीन पदार्थांचा समावेश करून तुम्ही बारिक शरीरयष्टी मिळवू शकता.

कामिनी  सांगतात की,  अनेकांना हिवाळ्यातील थंडीमुळे लोकांना चादरीतून बाहेर पडायचे नसते. यामुळे जिम आणि इतर वर्कआउट्स करणंही थांबतं. घरी बसून आणि झोपेमुळे शरीरात चरबी जमा होते, ज्यामुळे लठ्ठपणा वाढण्याची शक्यता जास्त आहे. अंथरुणावर बसून लोकांना अधिक खाणे आवडते. दिवसभर आळशीपणा आणि खाण्याची इच्छा वजन वाढवते. 

चिंता वाढली! 'या' इन्फेक्शन्सवर निष्क्रीय ठरतोय औषधांचा वापर, WHO च्या तज्ज्ञांची माहिती

एवढेच नाही तर हिवाळ्यात चॉकलेट, चीज, भज्या यासारख्या गोष्टीही खूप आवडतात. या हंगामात वेगवेगळ्या प्रकारचे पराठे खायला मिळतात, ज्यामुळे आपले वजन वेगाने वाढते. हिवाळ्यात जास्त कपडे घातल्यामुळे आपल्या शरीरावर आपले लक्ष जात नाही. हिवाळ्यात, सण आणि लग्न-पार्टीचा हंगाम देखील इतर हंगामांपेक्षा खूप जास्त असतो, ज्यामुळे आपल्या खाण्याचा मूड अधिक वाढतो. 

Coronavirus: फेस मास्कसंदर्भात WHOच्या नव्या गाईडलाईन्स आणखी कठोर, आता दिल्या अशा सूचना

हिरव्या भाज्या, कंद मुळं

हिवाळ्यात हिरव्या भाज्या, कंद मुळांचा आहार  घ्या. शरीराला या भाज्यांमधून प्रीबायोटिक्स मिळतात, ज्या आपले वजन वाढू देत नाही. याशिवाय या भाज्या प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात. पचन सुधारण्यास देखील मदत करते. आपल्यासाठी रताळे, कांदा, मुळा इत्यादी भाज्या  खाणं चांगले राहिल.  यासह, ते रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यात मदत करतात.  

गावठी तूप

हिवाळ्यात गावठी तूप खाल्ल्याने वजन वाढत नाही.  तूपात अ, ई, डी जीवनसत्त्वे असतात जे वजन नियंत्रित करण्यास उपयुक्त आहेत. यासह, ते पचनक्रिया अधिक चांगले ठेवण्यासाठी प्रभावी आहेत, जे आपल्या शरीराचे वजन वाढू देत नाहीत.

शेंगदाणे

ज्याप्रमाणे ड्राय फ्रुट्सचे सेवन करणं शरीरासाठी लाभदायक ठरतं. त्याप्रमाणेच शेंगदाणे सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. शेंगदाण्यांमध्ये ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात. या फॅटी एसिड्समुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते. मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. म्हणून सकाळी लवकर उठून अभ्यास करत असलेल्या मुलांनाशेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. 

शेंगदाण्यांमध्ये अनेक प्रभावी गुण असतात. त्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. एका रिसर्चनुसार शेंगदाण्यांमध्ये कार्डियोप्रोटेक्टिव गुण असतात. कार्डियोप्रोटेक्टिव गुणांमुळे हृदयाच्या रोगांपासून लांब राहता येतं. 

वजन कमी करण्याचे उपाय

रोज नियमित व्यायाम करा.

सकाळी उठल्यानंतर 2 ग्लास गरम पाणी प्या.

न्याहारी वगळू नका.

अन्नामध्ये जास्त चरबी समाविष्ट करू नका.

तळलेले अन्न खाणे टाळा.

रात्री झोपायच्या आधी लवंगा किंवा दालचिनीचे पाणी प्या.

हळदीचे दूध प्या.

Web Title: Health Tips : Experts say 7 ways to stay fit in winter, easy weight loss tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.