तुम्ही सुद्धा गोड खाण्याचे शौकीन आहात? आजच बदला 'या' सवयी, नाहीतर होतील गंभीर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 03:14 PM2024-03-09T15:14:57+5:302024-03-09T15:18:12+5:30
गोड पदार्थ खाणं हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो.
Health tips : गोड पदार्थ खाणं हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच गोड पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाही. चव चांगली असली तरी साखर मिश्रीत गोड पदार्थ खाण्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्याची भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल याचं गांभीर्य कोणालाच नसतं.
किडनी हा आपल्या शरीरातील महत्वाचा भाग आहे. शरीरातील रक्त शुद्धीकरण करण्याचं काम या अवयवांवर अवलंबून असतं. शिवाय शरीरामधील घाण बाहेर टाकण्याचं महत्वाचं कार्य किडनीमार्फत होत असतं.
तसंच किडनी शरीरातील ऍसिड बाहेर टाकण्याचं काम करते. त्याबरोबरच रक्तातील पाणी आणि मिनरल्सचं संतुलन राखण्याचं महत्वाचं कार्य देखील किडनी करते. त्यामुळेच किडनीच्या संबंधित समस्या निर्माण झाल्यास किंवा किडनी निकामी झाल्यास इतर गंभीर आजारांचा धोका देखील वाढण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी किडनीची समस्या निर्माण होण्यासाठी अनेक कारणं जबाबदार असतात, ती कारणे कोणती हे आपण या निमित्ताने जाणून घेणार आहोत.
मिठाई तसेच गोड पदार्थ खाणं टाळा -
खरं तर मिठाई हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय़ असतो. मात्र, मिठाई खाल्ल्याने आपलं वजन तर वाढतंच शिवाय यामुळे रक्तात यूरिक ऍसिडचं प्रमाण देखील आपोआप वाढतं. मिठाई तसचं बाजारांमध्ये मिळणाऱ्या अन्य गोड पदार्थांमध्ये फ्रुक्टोज आढळतं ज्यामुळे मानवी शरीरात यूरीक ऍसिड वाढतं, असं तज्ञ म्हणतात.
आपल्या रक्तात युरीक ऍसिडचं प्रमाण वाढल्यास त्याचा नकळतपणे किडनीवर गंभीर परिणाम होवू शकतो. अगदी मूतखडा होण्यापासून ते किडनी निकामी होणं अशा विविध समस्या यामुळे उद्भवू शकतात.