गरम पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले की वाईट? शरीरावर काय परिणाम होईल; वाचा तज्ज्ञांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 02:08 PM2024-07-29T14:08:48+5:302024-07-29T14:11:17+5:30
गरम पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात यात शंका नाही.
Health tips for Drinking Warm Water : गरम पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात यात शंका नाही. चांगल्या आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, नॉर्मल पाणी पिण्यापेक्षा गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक संशोधनातूनही असे सिद्ध झाले आहे की, गरम पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील अनेक खराब तत्व बाहेर टाकण्यात येतात. पण जेव्हा कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन केले जाते तेव्हा आरोग्य बिघडण्याचा धोका वाढतो. गरम पाणी पिण्याची प्रत्येकाची स्वतःची कारणे आहेत. गरम पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत यात शंकाच नाही. पण जेव्हा कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन केले जाते तेव्हा ते आरोग्यासाठी घातकदेखील ठरू शकते. त्यामुळेच जेव्हा तुम्ही जास्त गरम पाणी पिता तेव्हा त्याचे शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात.
अन्ननलिकेवर परिणाम होतो-
गरम पाणी प्यायल्याने अन्ननलिकेवर सर्वाधिक परिणाम होतो. तोंड आणि पोट यांना जोडणारी ही अन्ननलिका आहे. गरम पाणी प्यायल्याने अन्ननलिकेतून दाणे बाहेर पडू लागतात. याबरोबरच त्यात जळजळही सुरू होते. ही वेदना दीर्घकाळ असते. जर तुम्ही रात्री झोपताना गरम पाणी प्यायले तर आजपासून ते करणे बंद करा. कारण झोपताना गरम पाणी पिऊन शांत झोपायला खूप त्रास होतो. तुम्हाला पुन्हा पुन्हा शौचालयात जावे लागू शकते.
किडनीच्या आरोग्याचा धोका-
जास्त गरम पाणी प्यायल्यानेदेखील किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो. संशोधनात असे दिसून आले आहे की, जास्त गरम पाणी प्यायल्याने किडनीच्या कार्यात अडथळा निर्माण होतो आणि किडनीवर जास्त दबाव येतो. जास्त गरम पाणी प्यायल्याने शरीराच्या अंतर्गत अवयवांवरही वाईट परिणाम होतो. ते जळण्याची शक्यता वाढते. शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या ऊती अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांच्यावर फोड येण्याचा धोका असू शकतो. जास्त गरम पाणी प्यायल्याने मेंदूच्या नसांना सूज येऊ शकते. एवढेच नाही तर गरम पाणी प्यायल्यानेही डोकेदुखी होऊ शकते.