प्लास्टिकच्या बॉटलमधील पाणी पित असाल तर आजच बदला सवय; तज्ज्ञांनी सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 03:21 PM2024-08-10T15:21:52+5:302024-08-10T15:23:59+5:30
बस, ट्रेन आणि विमानातून प्रवास करताना लोक प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरतात.
Side Effect of Plastic Water bottle : बस, ट्रेन आणि विमानातून प्रवास करताना लोक प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरतात. या बाटल्यांचा वापर घरांमध्येही सामान्य झाला आहे. बाटल्यांमधून प्लास्टिकच्या पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे आणखी एका नव्या संशोधनातून समोर आले आहे.
या बाटल्यांमधील पाण्यातून लहान प्लास्टिक कण रक्तामध्ये जातात, त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो, असे मायक्रोप्लास्टिक्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात म्हटले आहे. संशोधनानुसार, जेवण आणि पाण्यातून प्लास्टिकचे लहान कण रक्तात, आतडे आणि फुफ्फुसात जाऊ शकतात.
काचेच्या बाटल्यांमध्येही?
१) यापूर्वी एका संशोधनात मनुष्य दर आठवड्याला सुमारे पाच मायक्रोप्लास्टिक खात असून, हे असल्याचे समोर आले होते. ग्रॅम एका क्रेडिट कार्डच्या वजनाइतके काचेच्या बाटल्यांमध्ये पॅक केलेल्या पदार्थामध्येही मायक्रोप्लास्टिक सापडले आहे.
२) मायक्रोप्लास्टिक हे जगभरात चिंतेचे कारण बनले आहे. यामुळे हृदयरोग, हार्मोनचे असंतुलन आणि कर्करोग होतो.
नेमके काय झाले?
१) ऑस्ट्रियातील डेन्यूब प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी संशोधनात सहभागींना सहभागी करून घेतले.
२) त्यांना असे आढळून आले की ज्यांनी प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांतील पाणी पिणे बंद केले आणि दोन आठवडे नळाचे पाणी प्यायले त्यांच्या रक्तदाबात लक्षणीय
धोका टाळण्यासाठी काय?
जे लोक दीर्घकाळ प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पितात त्यांचा रक्तदाब वाढलेला असू शकतो. प्लास्टिकच्या बाटल्यांना लोकांनी पर्याय शोधायला हवा, त्यामुळे मायक्रोप्लास्टिकचे धोके टाळता येतील. पोटात प्लास्टिक गेल्यास आतडे आणि फुफ्फुसातील पेशींना अडथळा निर्माण करतात.
आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्लास्टिकच्या बॉटल तयार करण्यासाठी बीपीएसारखे घातक रसायन वापरले जाते. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिण्याने कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोकाा संभवतो. त्याचे आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होताना दिसतात.