सावधान! उभे राहून पाणी पिताय? होतील हे दुष्परिणाम; वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 03:34 PM2024-05-20T15:34:31+5:302024-05-20T15:37:55+5:30
दैनंदिन जीवनात अगदी छोट्या छोट्या सवयीही आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात.
Health Tips : दैनंदिन जीवनात अगदी छोट्या छोट्या सवयीही आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. आरोग्य नीट राखायचे असेल तर काही पथ्ये पाळावीच लागतात.
आजकाल लोक बाटलीतील पाणी पिण्यास प्राधान्य देत आहेत. तसेच ते उभे असताना पाणी पितात. असे करणे आरोग्यासाठी अजिबात चांगले मानले जात नाही. बऱ्याचदा आपण पाहिले असेल काही जण नेहमीच पाणी पिताना बसून पाणी पितात. तर काहींना उभे राहून पाणी पिण्याची सवय असते. पण या सवयीमुळे आपलेच नुकसान होते.
आयुर्वेदात असे म्हटले आहे की, उभे राहून किंवा झोपून कधीही पाणी पिऊ नये, त्याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे पोटाच्या समस्याही वाढू शकतात.
जर तुम्ही चालताना उभे राहून पाणी पीत असाल तर काळजी घ्या, कारण या स्थितीत पाणी पिल्याने तुम्ही तुमच्या आरोग्याशी खेळत आहात. यामुळे तुम्हाला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. उभे राहून किंवा झोपून पाणी पिणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. बसून आरामात पिणे पाणी उत्तम आहे. यामुळे शरीरातील सर्व महत्त्वाच्या अवयवांपर्यंत पाणी पोहोचते आणि आपले काम योग्य प्रकारे करू शकते.
उभे राहून पाणी पिण्याचे तोटे पुढीलप्रमाणे:
मूत्रपिंडांवर होतो परिणाम-
मूत्रपिंडाच्या रुग्णांनी उभे राहून पाणी पिऊ नये. हे देखील उभे राहून पाणी पिण्याचे दुष्परिणाम आहेत. उभे राहून पाणी प्यायल्याने सांध्यांचा त्रास होऊ शकतो. जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा पाणी शरीराच्या खालच्या भागात लवकर पोहोचते आणि पचनक्रिया बिघडू लागते म्हणून उभे राहून कधीही पाणी पिऊ नये आणि बसून पाणी पिणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.
तज्ज्ञांच्या दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांना किडणीच्या संबंधित काही असेल त्यांनी उभे राहून पाणी पिणे टाळावे. कारण उभे राहून पाणी प्यायल्याने मुत्रपिंडाला हानी पोहचू शकते. त्यामुळे आरामात एका जागेवर बसून पाणी प्यावे.
पचनसंस्थेवर होतो परिणाम -
उभे राहून पाणी प्यायल्याने पोटात गॅस तयार होतो, पचनसंस्थेवर दबाव येतो आणि शरीरात पाण्याचे असंतुलन होते. त्यामुळे बसून हळू हळू पाणी प्यावे. पण जर आपण उभं राहून पाणी पीत असाल तर, पाणी पोटाच्या खालच्या भागात पोहोचते, ज्यामुळे पचनसंस्थेला हानी पोहोचते. त्यामुळे नेहमी बसून पाणी प्यावे.