रोजच्या जेवणात चिमुटभर जास्त मीठ करेल घात; जाणून घ्या जास्तीचं मीठ खाल्याने काय होतील परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 04:37 PM2024-07-01T16:37:19+5:302024-07-01T16:40:17+5:30

मीठ हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.

health tips for eating too much salt in food increased high blood pressure and health problems research revealed | रोजच्या जेवणात चिमुटभर जास्त मीठ करेल घात; जाणून घ्या जास्तीचं मीठ खाल्याने काय होतील परिणाम 

रोजच्या जेवणात चिमुटभर जास्त मीठ करेल घात; जाणून घ्या जास्तीचं मीठ खाल्याने काय होतील परिणाम 

Health Tips: मीठ हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. जेवणात मीठ नसेल तर कोणत्याही पदार्थाला चव येऊ शकत नाही. आपल्या समोर पंचवक्वानाचं ताट  वाढून ठेवलं आणि त्यात जर मीठच नसेल तर ताटातील पदार्थ मिठाशिवाय बेचव लागतो. यावरून रोजच्या आहारात मीठ किती महत्वाचा घटक आहे हे यावरुन कळतं. पण, एखाद्या पदार्थाची चव वाढवण्याकरिता मीठ जेवढं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आरोग्यासाठीही मीठ खाणे उपयुक्त असते. मात्र, रोजच्या जेवणामध्ये मिठाचा वापर किती प्रमाणात करावा यालाही काही मर्यादा आखलेल्या आहेत. रोजच्या आहारात मिठाच्या जास्तीच्या वापरामुळे आरोग्याचे बरेच प्रश्न निर्माण होऊ शकतात. असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. 

मीठ म्हणजेच 'सोडियम क्लोराईड' हा घटक शारिरिक प्रकियेमध्ये महत्वाची भूमिका निभावतो. शरीरात मिठाच्या कमतरतेमुळे गंभीर नुकसानही होऊ शकतात. त्याचबरोबर आहारामध्ये जास्त प्रमाणात मिठाचा समावेश केल्यास ते आरोग्यासाठी अपायकारक मानलं जातं.  शरीराला योग्य मीठ प्रमाणात मीठ मिळाले नाही तर तब्येत बिघडते. असं डॉक्टरांच म्हणणं आहे. 

ब्लड प्रेशरचा धोका -

दीर्घकाळ रोजच्या जेवणामध्ये मिठाचा गरजेपेक्षा जास्त वापर केल्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.शिवाय हाय बीपी म्हणजेच ( उच्च रक्तदाब) च्या समस्येला सायलेंट किलर म्हणूनही ओळखले जाते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, वेळेआधीच यावर नियंत्रण मिळवता आले नाही तर ह्रदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार डोकं वर काढतात. त्यामुळे वारंवार तुमचं ब्लड प्रेशर वाढत असेल तर अशा स्थितीत आहारात मिठाचा वापर कमी करावा किंवा न केलेलाच बरा. 

तहान लागणे-

जास्त मीठ खाल्ल्यामुळे सारखी तहान लागते. अशातच पाणी प्यायल्या नंतरही जर तुम्हाला पुन्हा पाणी प्यावेसे वाटत असेल तर मिठाचं सेवन कमी प्रमाणात करणं गरजेचं आहे. 

किडणी संबंधित समस्या उद्भवतात-

आहारात गरजेपेक्षा जास्त मीठाचा वापर करत असाल तर ही सवय बदलणं महत्वाचं ठरेल. किडणी रक्तातून अतिरिक्त प्रमाणात असलेलं सोडियम फिल्टर करण्याचं काम करते. ज्यावेळेस तुम्ही  जास्त प्रमाणात मीठाचं सेवन करता त्याच्या परिणाम थेट किडणीवर होतो. 

Web Title: health tips for eating too much salt in food increased high blood pressure and health problems research revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.