शिंकांनी बेजार झालात? नाकातून पाणी येतं, स्थिती गंभीर होण्याआधी वेळीच करा 'हे' योग्य उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 04:14 PM2024-07-19T16:14:03+5:302024-07-19T16:17:38+5:30

पावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे सर्दी-खोकला अशा आजारांनी अनेकजण त्रस्त असतात.

health tips for monsoon increasing risk of cold and cough know about some home remedies can help relieve and symptoms  | शिंकांनी बेजार झालात? नाकातून पाणी येतं, स्थिती गंभीर होण्याआधी वेळीच करा 'हे' योग्य उपाय

शिंकांनी बेजार झालात? नाकातून पाणी येतं, स्थिती गंभीर होण्याआधी वेळीच करा 'हे' योग्य उपाय

Health Tips For Monsoon : पावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला अशा आजारांनी अनेकजण त्रस्त असतात. अशुद्ध पाणी गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ, टायफॉइड अशा विकारांवर निमंत्रण देतं. शिवाय पावसाळ्यात साथीचे रोग थैमान घालतात. त्यामुळे आजार आणखी बळवतात. पण सर्दी-खोकला यांसारखे साधारण वाटणारे आजार जास्त तापदायक ठरतात.

दरम्यान, पावसाळ्यात कधी कधी सलग शिंका सुरु होतात. सुरुवातीला आपण नाकात काही तरी गेले असेल किंवा थंड वातावरणाचा त्रास झाला असेल असं समजून त्याकडे दुर्लक्ष करतो. दरम्यान, पावसाच्या दिवसांत वरच्या वर आपल्याला सर्दी, खोकला जाणवू शकतो.पण जर खूप दिवस होऊनही तुमची सर्दी काही केल्या बरी होत नसेल सारखं नाकातून पाणी येत असेल तर मात्र, तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. एक-दोन आठवड्यापेंक्षा टिकणारी सर्दी ही साइनोसाइट्सचे लक्षण असू शकते. सर्दीसह तुम्हाला ताप, खोकला आणि सतत थकवा जाणवत असेल तर वेळीच लक्षणे तपासून घ्या.पावसाळ्याच्या थंड वातावरणामुळे हा त्रास बळावू शकतो आणि जर योग्य उपचार केले नाही तर स्थिती गंभीर होऊ शकते. असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

काय काळजी घ्याल?

सकस आहार, नियमित व्यायाम तसेच व्यसनांपासून दुर राहा. अनेकजण आजार, दुखणे अंगावर काढतात. सर्वसामान्य गरीब रुग्णांना मोफत उपचार जिल्हा रुग्णालयात घेता येतात. त्यामुळे वेळीच वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. असं तज्ज्ञ सांगतात. 

असा मिळवा सर्दी, खोकल्यापासून आराम-

१) गूळ आणि आले-

जर तुमचा सर्दी,खोकला औषध घेऊनही बरा होत नसेल तर तुम्ही नियमितपणे आले आणि गूळ मिसळून त्याचं सेवन करू शकता. हे छातीतील कफ काढून टाकण्यास महत करेल. पहिल्यांदा गूळ वितळवून त्यात आल्याची पेस्ट मिक्स करून घ्यावी. मिश्रण थोडं थंड होऊ द्यावं . त्यानंतर गूळ-आल्याची पेस्ट खावी. 

२) मध आणि आले-

मध आणि आले याचे मिश्रण सर्दी-खोकला आणि घसादुखीवर जोरदार हल्ला करतं. यासाठी एक आले बारीक तकरून त्यात मध मिसळा. दिवसातून ३ ते ४ वेळा याचं सेवन केल्यास खोकल्यापासून आराम मिळतो.  

या लक्षणांकडे दूर्लक्ष करू नका-

१) जर तुम्ही सर्दी आणि खोकल्याला हलक्यात गेत असाल तर त्याकडे चुकूनही दूर्लक्ष करु नका. 

२) कारण सर्दी, खोकला, घसादुखी, ताप श्वास घेताना त्रास ही कोरोनाची लक्षणे आहेत. 

३) अशी लक्षणे दिसल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधून तुमची चाचणी करून घ्या. 

Web Title: health tips for monsoon increasing risk of cold and cough know about some home remedies can help relieve and symptoms 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.