गरमागरम वडा-समोसा पाहताच मोह आवरत नाही? पावसाळ्यात तळलेले पदार्थ खाणं टाळा, कारण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 16:40 IST2024-07-15T16:35:51+5:302024-07-15T16:40:57+5:30
पावसाळा आला की वाफाळता चहा आणि सोबत चमचमीत तळलेले पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते.

गरमागरम वडा-समोसा पाहताच मोह आवरत नाही? पावसाळ्यात तळलेले पदार्थ खाणं टाळा, कारण..
Health tips For Monsoon : पावसाळा आला की वाफाळता चहा आणि सोबत चमचमीत तळलेले पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते. पाणीपुरी, भेळ, पॅटीस, गरमागरम भजी, पकोडे, मॅगी आणि असेच पदार्थ लोकं मोठ्या आवडीने खातात. रस्तोरस्ती गल्लीबोळात हातगाड्यांवर गरमागरम वडा-समोसे पाहिले की आपल्या जिभेला पाणी सुटतं. पण मनाने कितीही हट्ट केला तरी, आवर घाला आणि असे पदार्थ खाणे कटाक्षाने टाळले पाहिजेत. कारण हे पदार्थ खाऊन आपसूकच विविध आजारांना निमंत्रण मिळू शकते.
बऱ्याचदा वारंवार हे पदार्थ वापरलेलं तेल वाया जाऊ नये म्हणून त्यामध्ये इतर पदार्थही तळले जातात. मात्र, आपल्या प्रकृतीसाठी असे तेळकट पदार्थ खाणं नुकसानकारक आहे. परिणामी कर्करोगासारखे घातक आजार होण्याची शक्यता जास्त असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
काय परिणाम होतो-
खाद्यपदार्थ तळलेले तेल पुन्हा-पुन्हा गरम केल्याने त्याची रचना बदलते. त्यात एक्रोलिन हे विषारी तसेच कर्करोगजन्य रसायन तयार होते. एकाच तेलात वारंवार तळलेले पदार्थ खाल्ल्यास उच्च रक्तदाब एथेरोस्केलेरेसिस, अल्झायमर, यकृताचा आजार यांसारखे आजार होण्याची भीती वाटते.
मिश्र तेल, साधेल मेळ-
आरोग्य उत्तम राहण्यासाठी तुम्ही मिश्रित तेलाचा वापर करू शकता. जसे पूर्वी तांदळाचा कोंडा ( राईस ब्रान) तेल आणि सोयाबीन शिवाय पूर्वी वेगवेगळ्या भाज्या,डाळी तसेच अन्नपदार्थ तयार करण्यासाठी कधी करढई तर कधी सूर्यफूल तर कधी खोबऱ्याचे तेल वापरले जायचे. त्यामुळे प्रत्येक वेळी आहारात वेगवेगळ्या तेलाचा वापर करा असं, आहारतज्ज्ञ सांगतात.
तळलेले पदार्थ खाणं जीवावर बेतणार-
घरी वडापाव समोसा बनण्याचा बेत करत असाल तर एकदा तेल वापरले की त्याचा नंतर खाण्यात वापर करा. मात्र, ते वारंवार गरम करणे अथवा पुन्हा त्याचा खाण्यासाठी वापर करणे टाळा. यामुळे त्यात मोठ्या मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॅट तयार होतात. त्याच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल वाढते आणि कर्करोग होण्याची शक्यताही नाकारता येता नाही. तेलाचा पुन्हा- पुन्हा तळण्यासाठी वापर करणे टाळा कारण हे करणं जीवावर येत असलं तरी ते जीवावर बेतेल एवढं मात्र नक्की. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तळलेले पदार्थ खाणं टाळलं तर योग्य ठरेल.