बैचैन वाटतं, घाम येतो? मग 'ही' असू शकतात गंभीर आजाराची लक्षणं, आजच घ्या तज्ज्ञांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 12:49 PM2024-06-25T12:49:55+5:302024-06-25T12:52:42+5:30

बदलेल्या लाइफस्टाइलमुळे अनेक लोक आजकाल नैराश्य, चिंता, पॅनिक अटॅक अशा आजारांना बळी पडत आहेत.

health tips for panic attack disorder know about its symptoms and causes  | बैचैन वाटतं, घाम येतो? मग 'ही' असू शकतात गंभीर आजाराची लक्षणं, आजच घ्या तज्ज्ञांचा सल्ला

बैचैन वाटतं, घाम येतो? मग 'ही' असू शकतात गंभीर आजाराची लक्षणं, आजच घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Panic Attack Symtoms And Causes:  बदलेल्या लाइफस्टाइलमुळे अनेक लोक आजकाल नैराश्य, चिंता, पॅनिक अटॅक अशा आजारांना बळी पडत आहेत. या आजारांना वेळीच ओळखून उपचार न केल्यास याचे वाईट परिणाम होऊ शकतात. हे आजार टाळण्यासाठी किंवा यातून लवकर बाहेर पडण्यासाठी मानसिक आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. पॅनिक अटॅकमध्ये अनेकदा काही लोकांना अगदी हृदयविकाराचा झटका आल्यासारखे जाणवते. पॅनिक अटॅकमुळे तुम्हाला इतर काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

पॅनिक अटॅक म्हणजे काय ? 

पॅनिक डिसऑर्डर ही एक अशी मनः स्थिती आहे, ज्यामध्ये पीडित व्यक्ती भिती आणि चिंतेखाली वावरत असते.  अशा व्यक्ती काहीवेळेस इतक्या घाबरतात की, त्यांना आपल्याला एखादा मोठा आजार झालाय किंवा एखाद्या मोठ्या समस्येने ग्रासलं आहे, असं वाटतं. त्या व्यक्तीचं हृदय वेगाने धडधडू लागली. पीडित व्यक्तीला असे वाटते की, त्याच्याबरोबर चुकीचं काहीतरी घडतंय.

लक्षणे -

छातीत दुखणं किंवा छातीत जडपणा जाणवणे हे सर्वात सामान्य लक्षण आहे. याशिवाय श्वास लागणे, घाम येणं किंवा उलट्या होणं ही सामान्य लक्षणं आहेत. ही लक्षणे लगेच किंवा काही तासांनंतर दिसतात.

पॅनिक अटॅकवर उपाय काय?

१) पॅनिक अटॅक टाळण्यासाठी अजूनतरी कोणताही विशिष्ट मार्ग किंवा उपाय नाही. मात्र, काही पद्धती अवलंबून हा अटॅक टाळता येऊ शकते. 

२) पॅनिक अटॅकचा त्रास वाढण्यापासून किंवा अधिक वेळा होण्यापासून रोखण्यासाठी शक्य तितक्या लवकर उपचार करा. यासाठी वरती नमूद केलेली लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा. 

३) पॅनिक अटॅक वारंवार येण्यापासून निरोगी लाईफस्टाईल आणि योग्य आहार ठेवा. नियमित शारीरिक हालचाली करा, त्यामुळे तणावाची समस्या नियंत्रणात ठेवता येईल.

Web Title: health tips for panic attack disorder know about its symptoms and causes 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.