रात्री जेवणानंतर लगेच ढाराढूर झोपता? जेवण आणि झोप यामध्ये किती अंतर असावे; जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 01:31 PM2024-06-27T13:31:30+5:302024-06-27T13:39:36+5:30
जेवल्यानंतर तुम्ही लगेचच झोपी जात असाल तर आजच ही सवय बदला नाहीतर त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
Health Tips : रोजची धावपळ आणि कामाचा थकवा त्यामुळे बऱ्याचदा काही लोकांना रात्री जेवण केल्यानंतर लगेचच झोपी जाण्याची सवय असते. झोप पूर्ण करण्याच्या प्रयत्नात ते जेवण केल्यानंतर लगेच ढाराढूर झोपतात. मस्त जेवणावर ताव मारून खुशाल झोपायचं म्हणजे स्वर्गसुख असा त्यांचा समज आहे. रिपोर्टनुसार, असं करणं चुकीच आहेच शिवाय आपल्या आरोग्यावर त्याचे नळतपणे दुष्परिणाम होतात.
तज्ज्ञांच्या मते, जेवल्यानंतर लगेच झोप येणे किंवा झोपी जाणे हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. त्यामुळे पचनक्रियेचा वेग मंदावतो तसेच लठ्ठपणा वाढतो.
या गंभीर समस्या उद्भवू शकतात-
१) पचनक्रिया कमजोर होते-
जेवल्यानंतर लगेचच झोपल्याने त्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो. शिवाय त्यामुळे अन्नाचे पचन मंद होते आणि पोटभर जेवून लगेच झोपल्यास अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. एवढेच नाही तर त्यामुळे गॅस आणि अॅसिडिटी होऊ शकते.
२) अनिद्रा-
रात्री झोपल्यानंतर आपल्या शरीरात आम्लपित्त तयार होतं. त्यामुळे आंबट ढेकर, छातीत जळजळ होते. त्यामुळे आपली झोपमोड होऊ शकते.
३) वजन वाढते-
शरीरातील कॅलरीज बर्न होत नसल्याने वजन वाढण्याची समस्या भेडसावते.आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानूसार, रात्रीचे जेवण केल्यानंतर जवळपास अर्धा तास मोकळ्या हवेत फेरफटका मारावा. त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते.
जेवणे आणि झोपणे यात नेमके किती तासांचे अंतर असावे ?
न्यूट्रिशननिस्टच्या मते, रात्री जेवण केल्यानंतर ३ तासानंतरच झोपावे. तसेच विशेष म्हणज जर आपण हेव्ही म्हणजेच जास्तच तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ खाल्ले असतील तर ३ तासांपूर्वी अजिबात झोपू नये. तसेच जेवल्यानंतर काही वेळ वज्रासनात बसावे, त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते आणि आम्लपित्ताचा त्रास होत नाही. याचबरोबर रात्रीचे जेवण जरा हलके असावे.