हात मिळवण्याच्या पद्धतीवरून मिळेल तुमच्या आरोग्याची माहिती, वाचा तज्ञ काय म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 04:17 PM2024-02-07T16:17:49+5:302024-02-07T16:22:06+5:30
जेव्हा कोणी व्यक्ती तुमच्यासोबत हस्तांदोलन करत असेल तर त्यावरून तुम्ही समोरील व्यक्तीच्या आरोग्याविषयी माहिती करुन घेऊ शकता.
Handshake and Health : जेव्हा कोणी व्यक्ती तुमच्यासोबत हस्तांदोलन करत असेल तर त्यावरून तुम्ही समोरील व्यक्तीच्या आरोग्याविषयी माहिती करुन घेऊ शकता. पण तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? त्याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेऊया.
खरं तर हस्तांदोलन केल्यास एखाद्या व्यक्तीच्या शारिरिक स्वास्थाबद्दल अंदाज लावता येऊ शकतो, असं तज्ञाचं मत आहे. एखाद्या व्यक्तीला शुभेच्छा देताना, त्याचे आभार मानताना किंवा बऱ्याच कालावधीनंतर त्या व्यक्तीला आपण भेटल्यानंतर हस्तांदोलन करतो. हात मिळवण्याची ही कृती जरी सामान्य वाटत असली तरी विज्ञानानूसार अशी कृती केल्यास कोणाच्याही शारिरिक सुदृढतेबाबत तुम्हाला प्राथमिक अंदाज घेता येऊ शकतो.
ह्रदविकाराचा धोका, स्मृतीभ्रंश किंवा जर एखादी व्यक्ती वारंवार अपसेट राहत असेल तर हस्तांदोलन केल्याने समोरील व्यक्तीचे शरीर एक विशिष्ट प्रकारचा सिग्नल देते.
क्वीन मेरी येथील हार्वे इंस्टिट्यूटचे प्राध्यापक स्टीफन पीटरसन यांच्या म्हणण्यानूसार, हस्तांदोलन करण्याची पद्धत हृदयविकाराचा धोका असलेल्या लोकांना ओळखण्यास मदत करते शिवाय यामुळे समोरील व्यक्तीवर लवकरच उपचार करून रोगाचे निदान करता येऊ शकते.
डिप्रेशन : आरोग्यतज्ञांनूसार, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण डिप्रेशनचे शिकार होतात. जे लोक डिप्रेशनच्या समस्येने ग्रस्त असतात, त्या व्यक्तीची हस्तांदोलन कराताना हाताची पकड ही सैल असते.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडीसीनच्या वैज्ञानिकांनी केलेल्या दाव्यानूसार कमकुवत हाताची पकड असलेले लोक नैराश्याचे बळी असतात. खरं तर, नैराश्याने ग्रस्त लोक अनेकदा थकल्यासारखे आणि कमजोर वाटतात. ज्यांची हाताची पकड कमजोर असते असे लोक नैराश्याला बळी पडतात. अशी माणसं ज्या वेळी हस्तांदोलन करतात तेव्हा त्यावेळेस त्याच्या स्वास्थाबद्दल तुम्ही अंदाज लावू शकता
स्मृतीभ्रंश : 'Chemist4U' चे फार्मासिस्ट इयान बड यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ज्या व्यक्तीच्या हाताची पकड कमजोर असेल तर त्या व्यक्तीचे शारिरिक स्वास्थ कमजोर आहे, असे समजले जाते.
हाइपरहाइड्रोसिस : एखादे काम केल्यानंतर जर शरीरातून घामाच्या धारा वाहत असतील तर त्यास हायपरड्रोसिस म्हणतात. हायपरहाइड्रोसिसमुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो. जे नैराश्य, तणाव किंवा इतर काही समस्या शरीरात वाढण्याचे संकेत देत असतात.
मृत्यूचा धोका : १९५१ ते १९७६ दरम्यान केलेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की ज्या लोकांची हाताची पकड कमकुवत आहे त्यांचा मृत्यू लवकर होऊ शकतो. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, ज्या लोकांची हाताची पकड मध्यम वयात कमकुवत होते त्यांना हृदय, श्वसनाचे आजार आणि कर्करोग होण्याची शक्यता असते.