Heath Tips : पुन्हा पुन्हा लघवी येणं असू शकतो या गंभीर आजारांचा संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 01:22 PM2022-03-09T13:22:02+5:302022-03-09T13:22:39+5:30

Frequent Urination Causes : पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागण्याचं कारण काही शारीरिक समस्याही असू शकते. म्हणजे पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागणं हा एखाद्या आजाराचा संकेतही असू शकतो.

Health Tips : Frequent urination causes reason and symptoms | Heath Tips : पुन्हा पुन्हा लघवी येणं असू शकतो या गंभीर आजारांचा संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Heath Tips : पुन्हा पुन्हा लघवी येणं असू शकतो या गंभीर आजारांचा संकेत, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

googlenewsNext

Frequent Urination Causes : पाणी प्यायल्यानंतर लघवी येणं सामान्य बाब आहे. त्याशिवाय काही लोक दिवसातून ३ ते ५ वेळा लघवीला जातात. तर काही लोक दिवसातून अनेकवेळा लघवीला जातात. पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागण्याचं कारण काही शारीरिक समस्याही असू शकते. म्हणजे पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागणं हा एखाद्या आजाराचा संकेतही असू शकतो. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सामान्यापेक्षा जास्त वेळ लघवीला जात आहात, तर वेळीच सावध व्हा.

काय आहे पुन्हा पुन्हा लघवीचं कारण?

जर एखादी व्यक्ती २४ तासात पुन्हा पुन्हा लघवीला जात असेल तर त्यांना फ्रिक्वेंटली यूरिनेशन श्रेणीत ठेवतात. रिपोर्टनुसार, जर एखादी व्यक्ती २४ तासात ८ किंवा त्यापेक्षा जास्त वेळा लघवीला जात असेल तर ती व्यक्ती या श्रेणीत येते. पुन्हा पुन्हा लघवी येण्याचा काही कारणंही असू शकतात. या समस्येमुळे झोप खराब होते. लघवीमुळे ब्लॅडर भरून राहत असल्याने झोप येत नाही आणि तुम्ही जागे राहता. या स्थितीला निक्टुरिया म्हणतात. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन समस्या दूर केली जाऊ शकते.

काही वेगवेगळ्या स्थिती आहेत ज्यामुळे पुन्हा पुन्हा लघवी येते. यातील काही कारणं ही तुमचं वय, लिंग किंवा या दोन्हींवर आधारित असतात. ही समस्या कधी जास्त गंभीर तर कधी सामान्य असते. पण काही परिस्थिती जास्त गंभीर होऊ शकतात.

यूरिनरी ट्रॅक आणि ब्लॅडरची स्थिती 

यूरिनरी ट्रॅक आणि ब्लॅडरची स्थिती पुन्हा पुन्हा लघवी येण्याची सर्वात कॉमन स्थिती आहे. या स्थितीत मूत्रमार्गात संक्रमण झाल्याने सुद्धा ही समस्या होऊ शकते. यूटीआय दरम्यान बाहेरील संक्रमण शरीरात प्रवेश करतं आणि तुमच्या लघवीच्या मार्गात सूज येऊ शकते. काही गंभीर केसेसमध्ये पुन्हा पुन्हा लघवी लागणं हे मूत्राशयाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

डायबिटीस

पुन्हा पुन्हा लघवी येणं हे डायबिटीसचं एक फार सामान्य लक्षण आहे. जर तुम्हाला टाइप १ किंवा टाइप २ डायबिटीस असेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा लघवी येण्याची समस्या होऊ शकते.

प्रोस्टेटची समस्या

प्रोस्टेट एक गोल्फ बॉलच्या आकाराची ग्रंथी असते. जी स्खलनादरम्यान निघणारे काही तरल पदार्थ तयार करते. तुमचं प्रोस्टेट शरीरासोबत वाढत असतं. पण जर याचा आकार जास्त वाढला तर याने समस्या निर्माण होऊ शकते. प्रोस्टेटचा आकार वाढल्याने तुमच्या यूरिनरी सिस्टीमवर दबाव पडतो आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा लघवी येऊ शकते.

इतर कारणं

स्ट्रोक

प्रेग्नेन्सी

पेल्विक ट्यूमर होणं

लघवीसंबंधी औषधांचं सेवन

फार जास्त मद्यसेवन किंवा कॅफीनचं सेवन
 

Web Title: Health Tips : Frequent urination causes reason and symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.