पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे पसरताहेत जीवघेणे आजार; संसर्ग होण्याआधी स्वतःला 'असं' ठेवा सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 03:23 PM2020-08-18T15:23:30+5:302020-08-18T15:26:56+5:30

सर्दी, एलर्जीची समस्या उद्भवते. पण या समस्येचा गरम पाण्याच्या सेवनानं नियंत्रणात आणता येऊ शकतं.  

Health Tips : Get rid of waterborne diseases in rainy season | पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे पसरताहेत जीवघेणे आजार; संसर्ग होण्याआधी स्वतःला 'असं' ठेवा सुरक्षित

पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे पसरताहेत जीवघेणे आजार; संसर्ग होण्याआधी स्वतःला 'असं' ठेवा सुरक्षित

googlenewsNext

कोरोनाच्या माहामारीत आता पावसाळ्यात साथीच्या आजारांनी थैमान घातलं आहे. साधा ताप, सर्दी, खोकला कोरोनाची लक्षणं याप्रमाणेच असल्यामुळे कोणतीही समस्या उद्भवल्यास कोरोनाची धास्ती लोकांच्या मनात असतेच.  पावसाळ्यात कॉलरा, मलेरिया, डेंग्यू, टायफाईड ,लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या समस्या उद्भवतात. अनेकजण लॉकडाऊनच्या काळात पूर्णवेळ  घरी असल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो. परिणामी श्वास घ्यायला त्रास होणं, सर्दी, एलर्जीची समस्या उद्भवते. पण या समस्येचा गरम पाण्याच्या सेवनानं नियंत्रणात आणता येऊ शकतं. दुषित पाण्याचे सेवन न केल्यास आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. 

पावसाळ्यात दुषित, अस्वच्छ पाणीपुरवठा होतो. नदीमध्ये सांडपाणी, कचरा, घाण हे मिसळल्यामुळे हे पाणी पिणं शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. असं दुषित पाणी प्यायल्यामुळे उलट्या, अतिसार, टायफॉइड आणि कावीळ यांसारखे अनेक साथीचे आजार होत असतात. पावसाळ्यात उकळून थंड केलेले स्वच्छ पाणी प्यावे. पाणी गरम करून वापरल्यामुळे पाण्यातील जंतू नष्ट होतात.

पाणी साठवून ठेवू नका. पिण्याच्या पाण्याची भांडी, पाण्याच्या टाक्या, पाईप्स वेळोवेळी स्वच्छ करा. पाण्याची भांडी झाकून ठेवा. पाणी साठवून ठेवल्यास डास निर्माण होतात. डासांमुळे अस्वच्छता पसरून डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार पसरतात.

पावसामुळे पुरेसा सुर्यप्रकाश नसल्याने  जंतूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे आपली प्रतिकार यंत्रणा कमकुवत होते. त्यामुळे आजारांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून पावसात भिजणं टाळा,  पावसात छत्री किंवा रेनकोट घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नका. रोगप्रतिकाशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करा. गाजर, हळदीचे दूध, आलं , लसूण, आहारात समावेश करा. हळदीत  अँटीऑक्सिडंट गुण आहेत. सर्दी आणि खोकल्यासाठी लसूण अतिशय गुणकारी आहे. श्वसनाची समस्या असणाऱ्यांसाठी आले खाणे अतिशय फायदेशीर आहे. उन्हाळा असो किंवा पावसाळा भरपूर पाणी प्या.

व्हिटॅमिन सी असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. व्हिटामीन डी घ्या. बाहेर जाणं शक्य नसेल तर इमारतीच्या गच्चीवर किंवा गॅलरीतून सुर्यप्रकाश अंगावर घ्या. कारण सध्याच्या स्थितीत लॉकडाऊनमुळे व्हिटामीन डी ची कमतरता लोकांच्या शरीरात निर्माण झाली आहे.  बाहेर पडत नसाल तरी घरच्याघरी २० ते ३० मिनिटं वेळ काढून व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. व्यायाम रोजे केल्याने तुमचं वजन वाढणार नाही.

रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहिल. याशिवाय शरीर ताजेतवाने राहून शांत झोप  येईल. जास्तीत जास्त गरम पाण्याचे सेवन करा. जेणेकरून घश्यासंबंधी तक्रारी उद्भवणार नाहीत. बाहेर जाताना मास्कचा वापर, सोशल  डिस्टेंसिंगचं पालन न चुकता करा. 

हे पण वाचा-

'या' चुकांमुळे घराघरांत शौचालयाच्या माध्यमातून आजार पसरतात; वेळीच सावध व्हा

दूधासह दुग्धजन्य पदार्थ जास्तवेळ टिकवून ठेवण्यासाठी 'ही' टेक्निक माहीत करून घ्या

Web Title: Health Tips : Get rid of waterborne diseases in rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.