लसूण खाण्याचे फायदे तर माहीत असतीलच, आता नुकसानही जाणून घ्या!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 06:08 PM2022-06-11T18:08:32+5:302022-06-11T18:08:49+5:30

Health Tips : लसणाचे अनेक फायदे असण्यासोबतच काही नुकसानही होतात. अधिक प्रमाणात लसणाचं सेवन केल्याचे जाणून घेऊया काही नुकसान.....

Health Tips : Harmful side effects eating raw garlic | लसूण खाण्याचे फायदे तर माहीत असतीलच, आता नुकसानही जाणून घ्या!!

लसूण खाण्याचे फायदे तर माहीत असतीलच, आता नुकसानही जाणून घ्या!!

Next

Side effects eating raw garlic  : लसूण जेवणाला स्वादिष्ट बनवण्यासोबतच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. वेगवेगळ्या आजारांच्या उपचारासाठी याचा औषध म्हणून वापर वर्षानुवर्षे केला जातो. लसणाची एक कळी अनेक आजारांवर रामबाण उपाय सांगितली जाते. मात्र लसणाचे अनेक फायदे असण्यासोबतच काही नुकसानही होतात. अधिक प्रमाणात लसणाचं सेवन केल्याचे जाणून घेऊया काही नुकसान.....

तोंडाच फोडं आलेल्यांसाठी लसूण अनेकदा फायद्याचा ठरतो. पण लसणामुळे तोंडाची दुर्गंधी, पोट किंवा छातीत जळजळ होणे, मळमळ वाटणे, उलटी होणे, शरीराची दुर्गंधी येणे अशाही समस्या होऊ शकतात. अशात कच्ची लसणाची पाकळी खाणे अधिक त्रासदायक ठरु शकते. त्यासोबतच ऑपरेशननंतर लसणाचं सेवन करणं अनेक अॅलर्जीचं कारण ठरु शकतो. 

त्वचेचं नुकसान

काही लोक हे चेहऱ्यावर लसणाची पेस्ट लावतात. पण हे काहींसाठी नुकसानकारक ठरु शकतं. काहींसाठी असं हे चांगलं असलं तरी काहींना यामुळे चेहऱ्यावर जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो. 

सर्जरी

लसणामुळे रक्ताचा संचार अधिक वेगाने होतो. त्यामुले सर्जरीच्या कमीत कमी दोन आठवड्यांपूर्वी लसणाचं सेवन करु नये. याने सर्जरीमध्ये अनेक अडचणी येण्याची शक्यता असते. 

ब्लीडिंग डिसऑर्डर

ताजा लसूण तुमची ब्‍लीडिंगची समस्या वाडवू शकतो. त्यामुळे ब्लीडिंग डिसऑर्डरच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी लसणाचं सेवन योग्य प्रमाणातच करायला हवं. 

हृदयासाठी घातक

अनेक संशोधनानुसार, लसूण खाल्लाने रक्तातील कोलेस्ट्रॉल स्तरात कमतरता आढळली आहे. असेही आढळले आहे की, लसणाच्या अधिक सेवनामुळे हृदय विकाराचा धक्काही आला आहे. 

पोट आणि पचनक्रियेत समस्या

कशातही मिश्रीत न करता तसाच कच्चा खाल्लेल्या लसणामुळे पोटात दुखणे, भूक कमी लागणे, गॅस, उलटी होणे, पोटात-छातीत जळजळ होणे, डायरिया अशाप्रकारच्या समस्या होऊ शकतात. 

Web Title: Health Tips : Harmful side effects eating raw garlic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.